- निसर्गाची अवकृपा
- पाऊस आला खूप
- नदीनाले भरुन गेले
- दिसे विनाशाचं रुप
- हातातोंडाशी घास आला
- हिरावून नेला
- आक्रोश करुन करून
- जगाचा बाप मेला
- जिथं जिथं शेतामंदी
- गुडघा गुडघा पाणी
- हसणाऱ्या बापाची
- करुण झाली वाणी
- वाढलेल्या ताटावरुन
- उठवून गेला
- आक्रोश करुन करून
- जगाचा बाप मेला
- लागून बसलं पानी
- पऱ्हाटीचे सडले बोंडं
- शैतकऱ्याच्या नशिबात
- कायम असतात धोंडं
- कंबरभर पाण्यामंदी
- बुडवून गेला
- आक्रोश करुन करून
- जगाचा बाप मेला
- नजर जाईल तिथपर्यंत
- पानी लागलं वाहू
- सोयाबीन त्याच्यामंदी
- आता लागलं पोहू
- थंड्या थंड्या तेलामंदी
- कडवून गेला
- आक्रोश करुन करून
- जगाचा बाप मेला
- सततच्या पावसानं
- फुटून गेले कोंबं
- कोनाच्या म्होरं आता
- कशी मारु बोंबं
- कर्जाच्या चिखलामंदी
- मढवून गेला
- आक्रोश करुन करून
- जगाचा बाप मेला
- वावराकडं पाहून येती
- या डोळ्यामंदी आसू
- अस्मानी सुल्तानी ताप
- जीवन लागलं नासू
- धपाटे घालुन पाढा
- पढवून गेला
- आक्रोश करुन करून
- जगाचा बाप मेला
- -पी के पवार
- सोनाळा बुलढाणा
- ९४२१४९०७३१
Contents hide