अमरावती : कोविड विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपत्कालीन उपाययोजनेचा भाग म्हणून लादण्यात आलेल्या निर्बंधावर कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून सूट देण्यात येत आहेत .यानुसार जिल्ह्यात उदयापासून चित्रपटगृह ,नाट्यगृह सुरू करण्यात येत आहे. तसेच आगामी येणाऱ्या सण-उत्सव कालावधीमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता सर्व प्रकारचे हॉटेल्स, रेस्टॉरेंट ,खाद्यगृहे इत्यादी यांना रात्री बारापर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे . या व्यतिरिक्त असलेल्या इतर आस्थापना उदाहरणार्थ दुकाने ,शॉपिंग मॉल्स ,प्रतिष्ठाने यांना रात्री अकरापर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात येत आहे.
उपरोक्त आस्थापना सुरू ठेवतांना कोविड विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन तसेच स्थानिक प्रशासन व जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक राहील, असे आदेश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज दिले आहे.
—–