- चला करूया मनाला साफ
- करूया सर्वाना माफ ।।1।।
- कशाला ठेवायची मनात घाण
- कशाला हवा खोटारडा मानपान
- कशाला हवी प्रसिद्धीची तहान
- म्हणुनी करूया मनाला साफ
- करूया सर्वांना माफ ।।2।।
- सोडून देऊया सर्व हेवेदावे
- खावे कशाला दुसऱ्याच्या कष्टाचे मेवे
- खोट्या प्रकाशाचे कशाला हवे दिवे
- म्हणुनी करूया मनाला साफ
- करूया सर्वजनांना माफ ।।3।।
- मन प्रसन्न करून जगुया सर्व
- जीवनात आणूया नवीन पर्व
- कशाला हवा कशाचाच गर्व
- म्हणुनी मनाला करूया साफ
- करूया सर्वजनांना माफ ।।4।।
- निलेश रामभाऊ मोरे
- मु,पोस्ट,मनभा
- तालुका कारंजा लाड
- जिल्हा वाशिम
Contents hide