• Tue. Sep 26th, 2023

कृषीपंपांना सौर विद्युतीकरणासाठी महाकृषी ऊर्जा अभियान

  अमरावती : शेता-शेतातील कृषीपंपाच्या सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरणासाठी ‘प्रधानमंत्री कुसुम योजना’ व महाकृषी ऊर्जा अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत असून, शेतकरी बांधवांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन ‘मेडा’तर्फे करण्यात आले आहे.

  Thank you for reading this post, don't forget to subscribe!
   योजनेची वैशिष्ट्ये :
   * पारेषण विरहित 2750 सौर कृषी पंपाची राज्यातील 34 जिल्ह्यात आस्थापना. शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होणार.
   * शेतकऱ्यांना धारण क्षमतेनुसार 3 एच. पी. डी. सी., 5 एच. पी. डी. सी. व 7.5 एच. पी. डी. सी.अश्वशक्ती सौर पंप उपलब्ध होणार.
   * सर्वसाधारण वर्गवारीच्या लाभार्थ्यांचे कृषी पंप किंमतीच्या 10% तर अनुसूचित जाती अथवा जमातीच्या लाभार्थ्यांना 5% हिस्सा.
   लाभार्थी निवडीचे ठळक निकष :
   * विहीर, बोरवेल, बारमाही वाहणारी नदी ई. तसेच शाश्वत पाण्याच्या स्रोत उपलब्ध असणारे शेतकरी.
   * पारंपारिक वीज कनेक्शन उपलब्ध नसणारे शेतकरी.
   * अटल सौर कृषी पंप योजना टप्पा – 1 व 2 किंवा मुख्यमंत्री सौर कृषी योजने अंर्तगत अर्ज केलेले तथापि मंजूर न झालेले अर्जदार शेतकरी
   * २.५ एकर शेतजमीन धारकास 3 एच. पी. डी. सी., 5 एकर शेतजमीन धारक शेतकऱ्यास 5 एच. पी. डी. सी व त्यापेक्षा जास्त शेतजमीन धारकास 7.5 एच. पी. डी. सी. क्षमतेचे सौर कृषी पंप अनुज्ञेय.

   या योजनेच्या सविस्तर माहितीसाठी व ऑनलाईन नोंदणीसाठी http://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Componenet-B व www.mahaurja.com या संकेतस्थळाला भेट द्यावी व अधिक माहितीसाठी महाऊर्जा विभागीय कार्यालय,अमरावती दुरध्वनी क्र. 0721 2661610 ई-मेल: domedaamravati@mahaurja.com वर संपर्क साधावा किंवा भेट देण्यात यावी. या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय महाव्यस्थापक प्रफुल्ल व. तायडे यांच्याकडून करण्यात आले आहे.


  —–
  (Images Credit : Maharashtra Today)

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,