- पाऊस गेला, थंडावा आला
- पठार माथा, हिरवा झाला
- नटली भूमी, फुलली फुले
- विविध रंगी, चांदणं डुले
- रंगाची जत्रा, भरली रानी
- निसर्ग गातो, आनंद गाणी
- सुवर्ण तेज, पडता अंगी
- खुलते तेज, अनेक रंगी
- लहर येता, खेळती झोका
- गळ्यात गळे, साधती मोका
- पठार कास, सौन्दर्य दान
- भूमीचा स्वर्ग, दिसतो छान
- -युवराज गोवर्धन जगताप
- काटेगाव ता.बार्शी
- जिल्हा सोलापूर
- 8275171227
—–
Contents hide