अमरावती: येथील रामपुरी कॅम्पमधील एका घरावर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने धाड टाकून 25 हजार 994 रूपयांचा गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखू या प्रतिबंधित पदार्थांचा साठा जप्त करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन सहआयुक्त श. म. कोलते यांनी कळवली आहे.
‘एफडीए’ने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, दि. 2 ऑक्टोबर रोजी ज्योतिष बुधरमल मंगवानी रा. रामपुरी कॅम्प, गल्ली नं. 3, शिवमंदिरामागे, अमरावती यांच्या राहत्या घरातून प्रतिबंधित पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी गाडगेनगर पोलीस ठाण्यात फिर्यादही दाखल करण्यात आली आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी भा. कि. चव्हाण यांच्या पथकाने प्राप्त गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू व तत्सम अन्नपदार्थ यांचे उत्पादन, साठवणूक व विक्री यावर महाराष्ट्रात बंदी आहे. यापुढेही अशा मोहिमांना गती देण्यात येणार असल्याचे श्री. कोलते यांनी कळवले.
(छाया : संग्रहित)