• Wed. Sep 20th, 2023

आयुष्यात ….

    जीवन जगत असताना
    स्वतः च्या स्वार्थासाठी दुसऱ्याच
    आनंद हिरावून घेऊ नका.!
    आयुष्यात…
    स्व कष्टाने जगून कधीच
    दुसऱ्याच्या संपत्तीवर
    विसंबून राहू नका..!
    आयुष्यात…
    साथ दुसऱ्याला
    देता येत नसेल तर
    खोटं वचन देऊ नका…!
    आयुष्यात…
    दुःखाने तडफडत असेल
    कोणी तर अंत त्याचा
    पाहू नका….!
    आयुष्यात…
    मान मिळत नसेल
    जिथे तर अजिबात
    तिथे जाऊ नका….!
    आयुष्यात…
    होत नाही आपल्याशी
    कोणाचं चांगलं तर
    वाईट तरी करू नका….!
    -सुरेश राठोड
    (कलाशिक्षक)
    राष्ट्रीय विद्यालय,भिवापूर
    जिल्हा.नागपूर
    9765950144

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,