- * विजय इंगळे यांच्या कुटुंबियांना मिळाला दिलासा !
- * इंगळे कुटुंबीयांनी मानले आमदार देवेंद्र भुयार यांचे आभार !
वरुड : मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार वरुड मोर्शी तालुक्यातील रुग्णांचा ईलाज करण्यासाठी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णसेवा देण्यासाठी नेहमी तत्पर राहत असून ज्या गरिबांजवळ विविध रोगांवर उपचार करून घेण्यासाठी पैसा नाही, ज्यांना मरणाशिवाय पर्याय नाही अशा रुग्णांना मदत करत आहे. आमदार देवेंद्र भुयार गरीब व कोणीही वाली नसलेल्या रुग्णांना स्वास्थ्य सुविधा पुरवविण्याचे काम करीत आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!गाडगे बाबा कॉलनी वरुड येथील विजय सुधाकर इंगळे वय 42 वर्षे यांच्यावर ब्रेन ट्युमर आजारावर सर्जरी शस्त्रक्रिया करणे गरजेचे आल्यामुळे शस्त्रक्रिये करीता 5 लक्ष रुपये खर्च येणार असल्याचे कळताच साधारण परिस्थिती असलेल्या विजय सुधाकर इंगळे यांच्या कुटुंबावर आभाळच कोसळले.
विजय सुधाकर इंगळे यांनी आमदार देवेंद्र भुयार यांची भेट घेऊन आपल्या होणाऱ्या त्रासाबद्दल व आर्थिक अडचणी बद्दल आपली व्यथा सांगताच आमदार देवेंद्र भुयार यांनी क्षणाचाही विलंब न करता विजय सुधाकर इंगळे यांना जसलोक हॉस्पिटल मुंबई येथे दाखल करून 5 लक्ष खर्च येणारी ब्रेन ट्युमर सर्जरी मोफत करून दिल्यामुळे विजय सुधाकर इंगळे यांना दिलासा मिळाला आहे.
शस्त्रक्रियेनन्तर विजय सुधाकर इंगळे यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येत आहे. आमदार देवेंद्र भुयार यांच्या पुढाकाराने रुग्णसेवक पंकज ठाकरे यांच्या सहकार्याने विजय इंगळे यांचे जीवन सुकर झाल्याने विजय इंगळे व त्यांच्या कुटुंबियांनी आमदार देवेंद्र भुयार, यांचे आभार व्यक्त केले.