धम्मसंस्कृतीच्या निर्माणाकरीता आपण काय करायला हवे?
साडेसहा दशक उलटूनही धम्माबाबत खरीखुरी आस्था ही व्यापक प्रमाणात दिसून येत नाही. विहारे निर्माण झाली परंतु त्याला परिणामकारक dhamma schoolचे स्वरुप प्राप्त व्हावे. पालि भाषा संवर्धन करण्यासाठी सामाजिक प्रयत्नाचा अभाव दिसतो. धम्माच्या तत्व आकलनाच्या प्रक्रियेत स्वतःला आणने गरजेचे आहे. केवळ अंधारात तीर मारुन चालत नाही. शहरी भागात थोड्या सुस्थीतित असलो तरी सुव्यवस्थित नाही. खेड्याची अवस्था अधिकच बकाल होत आहे. व्यसनाधिनता , नैराश्य आणि कमालिची अगतिकता माणसे अनुभवत आहे. या सगळ्या प्रश्नावर चर्चा होणे आवश्यक नाही का?
स्वतःच्या स्वानुभवाची दोन ओळीची कविता असेल. कथा असेल. जे समाजातून आपणास भेटते ते संवेदन एकमेकांशी शेअर करा. वैचारिक देवान घेवान थांबली आहे. भावनिक तुंबलेपण आपण अनुभवत आहोत. दिवस फार बिकट आहे. त्यातही कळकळ हरवत आहे. हे असेच चालत राहले तर भविष्यात काळोखाशिवाय काहीच हाती लागणार नाही.
धम्म संस्कृती आणि संविधानिक व्यवस्था ह्याच हातात हात घेऊन पुढे जावू शकतात. संपूर्ण बहुजन वर्गात हे सांस्कृतिक बिजारोपण झाले पाहिजे . माणूस माणूसपणाच्या बंधुभावाच्या सेंद्रिय तत्वाने परस्परांशी जुळला पाहिजे. त्यासाठी हृदयगामी संवाद होणे जरुरी आहे. कला , साहित्य व वक्तृत्व हे आपले साधने आहेत. अधिकत्तम लोकांपर्यंत आपण पोहोचले पाहिजे . पण त्याचा एक छोटासा प्रयत्न ! आपल्या सर्वांच्या प्रतिसादाने धम्माची चारिका एक विचार प्रवास जो मानवतेला दुःखमुक्तीकडे घेऊन जातो. हे साधले तरी ते अनुपम असेल. सर्वव्यापी धम्मसंस्कृती साठी हे आवश्यक नाही का?
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या