Header Ads Widget

गुर्जी..!

गुर्जी, आता येकच करजा
पोराले जगन्याचा मंतर देजा

नोका सांगू त्यायले बिनकामाच्या कथा
जाणून घेजा त्याच्या पोटाच्या व्यथा

लय झाले कारखाने मालाले बाजारपेठ नाही
इकल्या देशात जगाचं कसं ,त्याले माईत नाही

गुर्जी , झालंच तर येवळंच करजा
पोट भरन्याची येखांदी युक्ती सांगजा

पुळं त्याच्यासमोर नौकरीचा दुकाय हाये
थ्या दुकायातून त्याले उभं राहाचं हाये 

पैशामांगं धावण्याचंच शिक्षन नोका देजा
माणूस बनायचा थोळासा सल्लाई देजा 

आलाच तुमचा सल्ला कामात 
तर तुमचं नाव घेईन
ह्या रोजाची याद ठिऊन 
तुमाले शुभेच्छाई देईन !

- अरुण विघ्ने

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या