Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

शिक्षक साहित्य संघाच्या तेराव्या वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन


अमरावती :  शिक्षक साहित्य संघ, महाराष्ट्र राज्य तर्फे तेराव्या वर्धापन दिनाचा अाँनलाईन सोहळा  दि.५ सप्टेंबर ,२०२१  रोजी सायं.सात ते नऊ या वेळेत  होणार आहे.या वर्धापन दिन सोहळ्याला उद्घाटक व प्रमुख वक्ते साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त बारोमासकार *प्रा. सदानंद देशमुख असून   साहित्याची निर्मिती प्रक्रिया  या विषयावर ते मार्गदर्शन करणार आहेत तर अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक *.प्रा.डाँ.सतीश तराळ* राहणार असून प्रमुख अतिथी शिक्षक साहित्य संघाचे संस्थापक अध्यक्ष *श्री जयदीप सोनखासकर आहेत.शिक्षक साहित्य संघ केंद्रीय कार्यकारिणी तर्फे आयोजित या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागपूर विभागाच्या जिल्हा सचिव प्रा.वीणाताई राऊत*  तर पाहुण्यांचा परिचय नागपूर शाखेच्या उपाध्यक्षा *प्रा.लीनाताई निकम* देणार आहेत. *प्रा.अरुण बुंदेले स्वागत गीत गाणार असून कार्यक्रमाचे प्रास्ताविक  श्री जयदीप सोनखासकर* करणार आहेत.कार्यक्रमाच्या शेवटी पाहुण्यांचे *प्रश्नोत्तर व चर्चा या भागाचे सूत्रसंचालन अमरावती शाखेचे जिल्हाध्यक्ष  *अतुल ठाकरे* करणार आहेत. आभार प्रदर्शन केंद्रीय कार्यकारणीचे सचिव श्री *राजेश  सातव* करणार आहेत . महाराष्ट्रातील सर्व साहित्यिकांनी दि.५/९/२१ ला सायं.७ ते ९ या वेळेत https://meet.google.com/zvx-vctt-pyv या गुगलमीट अँप च्या लिंकवर क्लिक करून आँनलाईन
कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन  शिक्षक  साहित्य  संघाचे  केंद्रीय सचिव राजेश सातव  व पदाधिकार्‍यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code