Header Ads Widget

तक्षशिला महाविद्यालयातील पत्रकारिता व जनसंवाद विभागात प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

    * डीटीपी, फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, रेडिओ, टेलिव्हिजन, प्रिंट मीडियात करिअर करण्याची संधी

    * कोणत्याही शाखेतील १२ वी पास विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक अभ्यासक्रम

    अमरावती : श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टद्वारा संचालित तक्षशिला महाविद्यालयातील पत्रकारिता व जनसंवाद विभागात बी.ए. (जर्नालिसम अँड मास कम्युनिकेशन) या तीन वर्षीय अभ्यासक्रमासाठी प्रवेशास सुरुवात झाली आहे. कोणत्याही शाखेतील १२ वी पास विद्यार्थी या तीन वर्षीय पदवीला प्रवेश घेऊ शकतात. या अभ्यासक्रमानंतर स्पर्धा परीक्षा, सोशल मीडिया, डीटीपी, फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, रेडिओ, टेलिव्हिजन, प्रिंट मीडियात करिअर करू शकतात.

    हा पदवी अभ्यासक्रम संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामार्फत गेल्या ८ वर्षांपासून तक्षशिला महाविद्यालयात यशस्वीरीत्या राबविला जात असून अत्यल्प कमी फीमध्ये हा पदवी अभ्यासक्रम विद्यार्थी पूर्ण करू शकतात. या पदवी अभ्यासक्रमाला महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती मिळत असून सरकारी नोकरीबरोबरच , फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, सोशल वर्क, रेडिओ, टेलिव्हिजन, प्रिंट मीडियात करिअर करू शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर आहे. तक्षशिला महाविद्यालय नॅक पुनर्मुल्यांकन (बी+) श्रेणी प्राप्त असून श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट ही महाराष्ट्र शासनातर्फे धार्मिक (बौद्ध) अल्पसंख्याक दर्जा प्राप्त संस्था आहे. पत्रकारीता व जनसंवाद विभाग हा स्वतंत्र असून विद्यार्थ्यांसाठी अद्यावत संगणक लॅब, विभागीय लायब्ररी, नाममात्र शुल्कात वाई-फाय, स्पर्धा-परीक्षा अभ्यासिका उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी इच्छुक विद्यार्थी व्हाट्स अप क्रमांक ९९२२६२९८४५ ला तर कॉलिंगसाठी ७९७२४३५५३९/ ९०२८३७२८५९ संपर्क करावा असे आवाहन तक्षशिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मल्लू पडवाल यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.

    हा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी एमपीएससी, ग्रुप डी स्पर्धा परीक्षा, आयबीपीएस/ बँकिंग/ पीओ, सोशल मीडिया, डीटीपी, फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, रेडिओ, टेलिव्हिजन, प्रिंट मीडिया इत्यादी क्षेत्रात करिअर करू शकतात. सोबतच पत्रकारिता व जनसंवाद विभागात मराठी, हिंदी, इंग्लिश टायपिंग, ग्राफिक डिजाईन, पेजमेकींग, सोशल मीडिया हॅण्डलिंग, ब्लॉग क्रिएशन, यू-ट्यूब चॅनेल क्रिएशन, व्हिडीओ-ऑडिओ एडिटिंग, फोटो शूट अँड मिक्सिन्गचे अद्यावत प्रशिक्षण दिले जातात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या