Header Ads Widget

क्रांतीसूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर

  बाबासाहेब तुमच्या बोटाच्या दिशेने संसदेच्या मार्गाने जावू लागलो,
  तर आपले व परके पाय ओढू लागले.
  राजकिय हक्क प्रस्थापित करू लागलो,
  तर पायात सुरूंग पेरू लागले.
  संविधानाचे अस्त्र घेऊन चाललो,
  तर मनुस्मृतीचे कटकारस्थान करू लागले.
  क्रांतीसूर्याच्या ध्वजा खांद्यावर वाहू लागलो,
  तर प्रतिक्रांतीचे षडयंत्र रचू लागले.
  क्रांतीसूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर गर्जू लागलो,
  तर विषमतेचा तकलादू कल्लोळ करू लागले.
  बाबासाहेब ,आता खूप झालं.
  वेदनेलाही बांध असतोच,
  अराजकता पेरणाऱ्या अमाणूषतेला आग लावायची आहे.
  रक्तात पेटलेले अगणित सूर्य सळसळासला लागले आहे.
  माझ्या बांधवानो तुम्ही सोबत द्या नाहीतर नको,
  मी क्रांतीसूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरच्या निर्णायक महायुध्दाकडे प्रस्थान केले आहे.
  न्यायपालिका,संसद,कार्यकारीमंडळ यांना जाब विचारण्यासाठी.....
  एका हातात बुध्द् व एका हातात संविधान घेऊन...
  नव्या सूर्यभूमीच्या उद्या साठी..
  अविरत लढणार आहे...........
  -संदीप गायकवाड
  नागपूर
  ९६३७३५७४००

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या