अमरावती : आदिवासी विकास विभाग अमरावती अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पुसद यांच्या वतीने दिनांक 5सप्टे.2021रोजी रमाई अनुदानीत माध्य.व उच्च माध्य.आश्रमशाळा ,बाणगाव ता.नेर जी.यवतमाळ येथे मा.सावनकुमार(भा.प्र.से) प्रकल्प अधिकारी ए.आ.वि.प्र.पुसद तथा सहाय्यक जिल्हाधिकारी यांच्या शुभहस्ते पुसद प्रकल्पातील शासकीय व अनुदानीत आश्रमशाळांतील सन 2020-21 या शैक्षणिक सत्रात शालेय ,सामाजिक व प्रकल्प स्तरिय कार्यामध्ये भरीव कामगारी केल्याबद्दल शिक्षक दिनाचे औचित्य साधून तब्बल 27 शिक्षकांचा सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
पुसद प्रकल्पातून उच्च माध्यमिक विभागातून भरीव कामगिरीच्या संदर्भात गुणानुक्रमे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेले प्रा.नारायण दा.राऊत शासकीय माध्य.व उच्च माध्य.आश्रमशाळा वसंतपूर ता.दिग्रस यांचा सर्वप्रथम मा.श्री.सावनकुमार(भा.प्र.से)प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
या घवघवीत यशामुळे प्रा.नारायण राऊत यांचे पुसद प्रकल्पात सर्वच स्तरातून कौतूक होत आहे.प्रा.राऊत आपल्या यशाचे श्रेय प्राचार्य श्री एस.पी.नाईक,सहअध्यायी शिक्षकवृंद व विद्यार्थी यांना देतात..
0 टिप्पण्या