फास का आवळला
तुमच्यावीना नव्हते कुणी
विचार नाही केला..?
संघर्ष सोडून जीवनाचा
संपविले जीवन यात्रेला
आमची बघून फरफट
शांती मिळेल का आत्म्याला?
बैलाची नव्हती जोडी
जुंफलो असतो तिफणीला
घाम गाळून कष्टाचा
पिकविले असते शेतीला!
खांदा होता सोबतीला
चिंता नव्हती जगण्याची
अर्धी भाकर जरी ताटात
पोरांना उणीव नव्हती बापाची
सरकारने आत्महत्या ग्रस्तांना
घोषणा केली जाहीर मदतीची
कागदपत्र जमा करतांना
पायपीट झाली जीवाची
दोन वर्ष मारून चकरा
झीज झाली चपलांची
खिरापत दिली बँकेने
थोड्या थोड्या पैशाची
जीव तुमचा हो गेला
आमची झाली वाताहत
संसार चाक तुटल्याने
झाली दयनीय आमची गत
- सौ निशा खापरे
नागपूर
0 टिप्पण्या