गव्हानकुंड येथे आमदार देवेंद्र भुयार यांच्या उपस्थितीत शेतकाऱ्यांसोबत पोळा साजरा !
वरुड : मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी गव्हाणकुंड येथे स्वतः बैलांची सजावट व पूजन करून शेतकऱ्यांना बैलपोळ्याच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या कृषी संस्कृतीत बैलपोळा सणाचे मोठे महत्त्व आहे. शेतीला आधुनिकता प्राप्त होत असतानाही बळीराजाचे बैलांसोबत पूर्वापार चालत आलेले अनोखे नाते कधीही लुप्त होणार नाही. शेतकरी व बैल यांच्यातील हा स्नेहांकीत बंध असाच कायम राहणार असल्याचे प्रतिपादन आमदार देवेंद्र भुयार यांनी येवेळी केले.
शेतकर्यांचा सच्चा साथी म्हणून ओळखल्या जाणार्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण गव्हाण कुंड येथे आमदार देवेंद्र भुयार यांच्या उपस्थितीत हर्षोल्लासात साजरा करण्यात आला. या सणासाठी गव्हांनकुंड येथे आमदार देवेंद्र भुयार स्वतः उपस्थित राहून शेतकाऱ्यांसोबत बैलांची सजावट करून पूजन केल्यामुळे शेतकर्यांमध्ये कमालीचा उत्साह दिसून आला. गव्हांनकुंड येथे पोळ्यामध्ये आमदार देवेंद्र भुयार यांनी स्वतः बैलांचा साजशृंगार करून बैलांच्या पाठीवर सुरेख नक्षीकाम केलेली झूल, गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, मटाट्या, गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा, पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे आदी साहित्य लावून शेतकाऱ्यांसोबत बैलांची सजावट करून बैल सजविल्यामुळे गावकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळाले.
शेतकऱ्यांची उपजिविका असलेल्या बैलांचा योग्य मान, सन्मान या सणानिमित्य गव्हाण कुंड येथे बैलपोळा उत्साहात साजरा होतो. बैल हा शेतकऱ्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्राणी आहे, त्याच्यावरच आमची उपजिविका आहे, म्हणून पोळ्याच्या दिवशी बैल जोडीचा योग्य सन्मान करून आमदार देवेंद्र भुयार यांच्या उपस्थितीत पोळा सन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी गव्हाण कुंड येथील शेतकरी उपस्थित होते.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या