Header Ads Widget

नवीन विदयार्थ्यांची पिढी कुशाग्र असून त्यांना शिकवण्याकरिता शिक्षकांनी अद्यावत ज्ञान आत्मसात करणे काळाची गरज आहे- श्री. विक्रम टेकाडे

    चांदुर बाजार : स्थानिक गो. सी. टोम्पे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चांदुर बाजार येथे राष्ट्रीय सेवा योजना द्वारे शिक्षक दिनानिमित्य आचार्य देव: भव: या उक्तीप्रमाणे कार्य असणाऱ्या भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिना निमित्य “शिक्षक दिनाच" आयोजन करण्यात आले होते. या कार्याक्रमाला प्रमुख वक्ता म्हणून श्री. विक्रम टेकाडे, इंग्रजीचे प्रयोगात्मक शिक्षक, आनंद प्रायमरी स्कूल, चांदुर बाजार हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके, गो. सी. टोम्पे महा. तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा. डॉ. सुभाष शिरसाठ, इंग्रजी विभाग प्रमुख, प्रा. डॉ. रवींद्र डाखोडे, मराठी विभाग प्रमुख, प्रा. डॉ. ज्योती चोरे, गृहअर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. नंदकिशोर गव्हाळे, समन्वयक, आयक्यूएसी मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते.

    कार्यक्रमाच्या सुरवातीला डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. तदनंतर प्रा. डॉ. मंगेश अडगोकर यांनी प्रास्ताविकामध्ये कार्यक्रमाच्या आयोजना मागचे उदिष्ट व कार्याक्रमाची पाश्वभूमी स्पष्ट करतांना प्रमुख वक्ते श्री. विक्रम टेकाडे यांचा प्रयोगात्मक कार्याचा परिचय दिला. प्रमुख वक्ते श्री. विक्रम टेकाडे यांनी "शिक्षक आणि आजची शिक्षण प्रणाली" या विषयावर मार्गदर्शन करतांना शिक्षण प्रणालीतील खऱ्या अर्थाने महत्वाचा स्तंभ विध्यार्थी आणि शिक्षक कसे आहेत आणि शिक्षण क्षेत्रात होत असलेले बदल याबाबत भाष्य करत शिक्षकाने नेहमी विद्यार्थी राहून नवनवीन शिकत राहावे जेणे करून नवीन बदलला आपण सहजतेने सामोरे जावू असे मत व्यक्त केलेत. नवीन राष्ट्रीय शैक्षिक धोरणाची अंमलबजावणी होत असतांना अनेक बदल होईल त्याकरिता ग्रामीण विदयार्थी तयार असायला पाहिजे असे मत मांडत पालकांची जबाबदारी आज महत्वाची असून इंग्रजीचा बाऊ न करता व्याकाराणा व्यातिरिक्त आणि शब्दसाठ्या विना इंग्रजी भाषा कशी शिकावी याबाबत बारकावे सांगितलेत.

    कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके यांनी शिक्षक हा समाज घडवणारा एक दुवा असून समाज प्रबोधन करण्याचे काम आणि विदयार्थी योग्य पद्धतीने निवडून त्याची मानसिकता घडवतो आणि मनोबल वाढवतो असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन प्रा. डॉ. युगंधरा गुल्हाने, महिला कार्यक्रम अधिकारी यांनी केलेत, प्रास्ताविक प्रा. डॉ. मंगेश अडगोकर, कार्यक्रम अधिकारी तर प्रा. डॉ. प्रफुल्ल चौधरी, सहकार्यक्रम अधिकारी यांनी कार्यक्रमाचे आभार व्यक्त केलेत. श्री. गजेंद्र मुरळ, प्रा. ज्ञानेश्वर वारंगे, प्रा. डॉ. प्रियदर्शनी देशमुख, प्रा. डॉ. लालबा दुमटकर प्रा. डॉ. रविकांत कोल्हे, प्रा. सचिन भोंबे, प्रा. राणी इंगोले तसेच आभासी सभेत आनंद प्रायमरी स्कूलचे विदयार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे तांत्रिक जबाबदारी, प्रा. डॉ. प्रविण परिमल यांनी सांभाळली तर छायांकन श्री. रोशन सावरकर यांनी केले तसेच श्री. अभिजित देशमुख, श्री शरद नानोटे, श्री. शुभम मोहोड, रासेयो स्वयंसेवक श्रद्धा निम्भोरकर, श्री स्वप्नील मेश्राम, श्री. हर्षल ओकटे यांनी कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता प्रयत्न केलेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या