मूल : 27 ऑगस्ट 2021 रोजी प्रब्रम्हानंद मडावी यांच्या "बफरझोन" या कवितासंग्रहाचे प्रकाशन प्राचार्या रत्नमाला भोयर नगराध्यक्ष मुल यांचे शुभ हस्ते आणि प्रसिद्ध साहित्यिक दशरथ मडावी यांचे अध्यक्षतेखाली तसेच रवींद्र होळी तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी , ईश्वर आत्राम कार्यकारी अभियंता , धर्मराव पेंदाम जिल्हा कोषागार अधिकारी, देवानंद उईके वरिष्ठ सहायक वैज्ञानिक, डॉ.वामन शेळमाके साहित्यिक , राजेश मडावी पत्रकार तथा समीक्षक , प्रा.संदीप गायकवाड, नागपूर, सुनील शेरकी सिनेट सदस्य गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, प्रा.विजय लोनबले जिल्हाध्यक्ष समता परिषद , प्रा.विठ्ठल आत्राम इत्यादी मान्यवरांच्या उपस्थित कन्नमवार सभागृहात पार पडले. यावेळी कोव्हिड काळात रुग्णाची निःशुल्क सेवा करणारे डॉ.प्रवीण येरमे आणि डॉ.शारदा येरमे यांचा तसेच प्रसिद्ध चित्रकार भारत सलाम सर यांचा सन्मानचिन्ह आणि शाल तथा श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कवितासंग्रहावर भाष्य करताना प्रा.संदीप गायकवाड म्हणाले की,बफरझोन हा कवितासंग्रह परिवर्तन विचार पेरणारा आहे.आदिवासी समाजाला नवे मूल्य प्रदान करणारा आहे .माणसातील माणूसकीचे नाते घट्ट करणारा आहे.बफरझोन मधील कविता क्रांतीत्वाची अजिंठा खोदणारी आहे.कार्यक्रमाचे अध्यक्ष दशरथ मडावी सर म्हणाले की,बफरझोन हा कवितासंग्रह विस्थापित होणाऱ्या आदिवासी समाजाला लढण्यास तयार करणारा कवितासंग्रह आहे.ही कविता माणवमुक्तीचा जाहिरणामा आहे.या
कार्यक्रमाचे सुरेख संचलन प्रा. महेश गेडाम यांनी , प्रास्ताविक प्रा.विठ्ठल आत्राम तर आभार अरविंद मेश्राम यांनी मानले.
0 टिप्पण्या