Header Ads Widget

आयुष्याची आगगाडी

    आयुष्य म्हणजे आगगाडी
    आशेच्या रुळावर धावते
    स्टेशन चा सहारा घेत, शेवटी
    निराशेच्या स्टेशनवर उतरवते !!
    आयुष्य जणू डिझेल इंजिन
    संपले की भराच भरा
    शेवटपर्यंत आशा अपेक्षा
    शेवटी भडका उडले खरा !!
    डब्याला डबा जोडत चला
    बॅलन्स नीट सांभाळायचा
    एक डबा निसटला जरी
    आगगाडीला झटका लागायचा !!
    प्रवासी जणू नातीगोती
    आयुष्याची ती गुरूकिल्ली
    गाडीत बसूनच राहिले तरी
    उडवता नाही येत खिल्ली !!
    सुख दुःख सारे झेलावे
    थंडी ऊन असो पाऊस
    धावत सतत राहायचे
    हेच कर्तव्य करतो माणूस !!
    आगगाडी ची शिटी म्हणजे
    आई-वडील, बायको मुले
    भोवताली घालून रिंगण, जणू
    जपतो ओंजळीतील फुले !!
    आयुष्य किती सुंदर आहे
    समजावे त्याचे महत्त्व
    जीवन आनंदी जगावे हेच
    आयुष्याचे सत्व आणि तत्व !!
    -हर्षा वाघमारे
    नागपूर
(Images Credit : Pintrest)

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

goverdhan म्हणाले…
खूपच छान कविता
प्रवास करावा आवडीने,संभाळत सर्व स्टेशन्स
येणार्या जाणार्यांना सामावून घ्यावे,ठेवून सदा पेशन्स