Featured Post

Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

मास्तर...;

मास्तर
सालाबादप्रमाणे
याही वर्षी
तुझा 
शिक्षक दिन साजरा
झाला
मंत्र्या संत्र्याच्या 
अशुभ हस्ते
तुझ्या गड्यात
हारतुर्यानी तुझा
भव्यदिव्य सत्कार समारंभ संपन्न झाला
तुही तेवढ्या पुरता
मोहरून 
बहरून गेला
पण मास्तर
खरच तूझ्या
हृदयाला मनाला
आवडला का 
अहृदय सत्कार
तुझं संवेदनशील मन
किती रडल असेल
बेगडी सोहळा पाहून
मास्तर
तुला अस्तित्वहीन
केलं येथील 
भ्रष्ट व्यवस्थेनं
तू नागवल्या 
भरडल्या जातोय
कधी जातीयतेच्या
चक्कीत
तुझं आर्थिक शोषण
पाचवीलाच पूजलेलं
पगार फक्त तुलाच
मिळतोय
या जगाच्या पाठीवर
बाकी सगळ्यांना
पोट आहे
किती रे गब्बर झाले
येथील शिक्षण सम्राट
तू मात्र व्यवस्थेचा
गुलाम
म्हणतात 
शिक्षक पिढया घडवतात
देश बनवतात
नुसत्याच वलग्ना
असतात भाषणात
पुस्तकात
मास्तर तुला
बऱ्यापैकी पगार
मिळायला लागला
तर समाज
डोळे वटारून बघायला
लागला
संस्थाचालक फाडून
खाऊ की गिळून
खाऊ 
करायला लागला
मास्तर 
तरीही तू सगळं
सहन करून
निमूटपणे ज्ञानदानाच
काम 
निरंतर करतोस
तुला मानसन्मान
हार तुऱ्याची आस नाही
तू शोधतोय
आत्मसन्मान
तोच मिळत नाही तुला
तू शोषित पिढीत
दुर्लक्षित
तरीही मास्तर
तू लढतो व्यवस्थेशी
अन 
घडवतो देश
बघतो भविष्य
नवभारताच
चिमुकलयांच्या
डोळ्यात ...
     
 - राजेंद्र क. भटकर

(सौ- इंडिया टुडे)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code