• Tue. Jun 6th, 2023

सामाजिक योद्धा पुरुषोत्तम राऊत

  अकोला तालुक्यातील घुसर या गावामध्ये आपला शेती, व्यवसाय सांभाळत असताना समाजकार्याची आवड असलेला युवा सामाजिक कार्यकर्तेत्यांनी विविध सामाजिक संस्था संघटनांच्या माध्यमातून आपले समाज कार्या गेल्या तीस वर्षापासून करीत आहे.शेती, युवक, महिला, बेरोजगार, बचत गट, सेंद्रिय शेती, आधी विविध विषयाला धरून त्यांनी अनेक कामे केली आहे समाजकारण-राजकारण करीत असताना त्यांनी कोणते प्रकारे भेदभाव पहालेला नाही. वयाच्या एकविसाव्या वर्षापासून समाज कार्याला त्यांनी सुरुवात केली असून आजतागायत त्यांचे हे कार्य सातत्याने चालू आहे. दिशा बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून त्यांनी कामाचा मोठ्याप्रमाणात झपाटा लावला होता व त्या माध्यमातून अनेक शेतकरी युवक महिला संस्थेशी जोडून त्या माध्यमातून अनेक मोठमोठे कामे पार पाडली आहे. नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून त्यांनी अनेक समाजोपयोगी कार्य केले आहे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन शासनाने नेहरू युवा केंद्राच्या वतीने त्यांना जिल्हा युवा पुरस्कार सुद्धा प्राप्त झालेला आहे.

  त्याचप्रमाणे विविध सामाजिक संस्था संघटनेच्यावतीने सुद्धा त्यांना अनेक पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेले आहे. त्याच बरोबर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या चळवळीशी जुळून गेल्या अनेक वर्षांपासून ते सातत्याने भ्रष्टाचाराचा विरोध काम करीत आहे. ग्रामीण पत्रकार संघटना, निर्भय बनो जनांदोलन माहितीचा अधिकार, ग्रामसभा, रॉकेल गॅस संबंधित कायदा, रेशनिंगच्या बाबत कायदा दारूबंदीचा कायदा अनेक कायद्यासाठी त्यांनी वेळोवेळी आंदोलने उपोषणे मोर्चे केलेले आहेत. युवा या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शेतकरी व महिला बचत गटांसाठी मोठी एक चळवळ उभी केली होती त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्न सोडून त्यांना विविध शासकीय योजनेचा लाभ मिळवून दिलेला आहे.

  अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोबत जुडून प्राध्यापक श्याम मानव यांच्या कार्याचा प्रसार आणि प्रचार ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात करून अनेक कार्यक्रमाचे आयोजन नियोजन करून ग्रामीण भागात अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत . गावा, गावामध्ये असलेला रेशनिंग चा भ्रष्टाचार थांबवण्यासाठी गाव तेथे रेशनिंग कृती समितीची शाखा स्थापन करून, रेशीम बाबत जनजागृती जाहीर सभा घेऊन लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण केलेला आहे. शेतकरी जागर मंच या माध्यमातून शेतकरी व मजुरांचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने ते कार्य करीत आहेत. माहितीचा अधिकार, जनलोकपाल कायदा व्हावा म्हणून माझ्यासोबत त्यांनी अनेक आंदोलने केली आहेत. धरणे, मोर्चे, उपोषणे, रास्ता रोको आंदोलन, आदी विविध आंदोलने करून त्यांनी शासनावर दबाव आणून जनतेचे अनेक प्रश्न सोडवले आहेत. अशा या धडपड्या युवा सामाजिक योद्धा चा आज वाढदिवस त्यानिमित्ताने त्यांना आज वाढदिवसाच्या हार्दिक अभिनंदन…!”तुम जियो हजारो साल साल के दिन हो पचास लाख” पुढील सामाजिक व राजकीय प्रगतीसाठी त्यांना मनापासून लाख लाख शुभेच्छा…!

  -गजानन ओंकार हरणे,
  समाजसेवक तथा पत्रकार
  खडकी अकोला.
  मोबाईल नंबर 9822942623.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *