अमरावती : अनेक सामाजिक संस्था संघटनेच्या माध्यमातून समाजकार्यात अग्रेसर असलेले अनेक पुरस्कार प्राप्त समाजसेवक गजानन ओंकार हरणे यांचा नुकताच मूर्तिजापूर येथे कार्य गौरव म्हणून सत्कार करण्यात आला. शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन ज्येष्ठ पत्रकार विलास मुलमुले, मुर्तीजापुर ग्रामीणचे ठाणेदार गोविंद पांडव आदर्श शिक्षक मुख्याध्यापक जयदीप सोनखासकर, मा. न पा उपाध्यक्ष तथा नगरसेवक सुनिल पवार, मुख्याध्यापक ऊजवला सावरकर खारोडे, पत्रकार जयप्रकाश रावत, संतोष माने, मोहित शेख, निलेश सुखसोहळे, प्रशांत चिंचोळकर, पंडित सर, विनायक थेटे, अक्षय डहाके आजी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये गजानन हरणे यांचा कार्याचा गौरव करून त्यांना गौरवण्यात आले शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे संचालन विलास नसले, तर आभार प्रदर्शन संजय उमक यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता संकल्प क्रीडा मंडळ, पत्रकार संघटना, निर्भय बनो जनआंदोलन चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.