• Thu. Sep 28th, 2023

मोबाईल वरदान

    भ्रमणध्वनित । जगातील ज्ञान ।
    मानवी जीवन । विकसित ॥१॥
    विश्व हेची घर ।कल्पना विचार ॥
    प्रत्यक्ष साकार । मोबाईल ॥२॥
    खरेदी करता। गुगल -फोन पे ।
    मुक्त पाँकेट पे । जीवनात ॥३॥
    आँनलाईन हे । देऊन जीवन ।
    ई-परिवर्तन । घडविलं॥४॥
    जेथे जावे तेथे । तू माझा सांगाती।
    जुळवितो नाती । मोबाईल॥५॥
    तिकिट क्षणात ।रेल्वे नि विमान ।
    आनंदित मन। प्रवाशांचे ॥६॥
    ई-मेल कमाल । हवे ते लिहून ।
    द्यावे पाठवून। क्षणातच ॥७॥
    श्रम आणि वेळ । कागद वाचला।
    देऊ ई-मेल ला। धन्यवाद ॥८॥
    ग्रंथालय कुठे?। भ्रमणध्वनित ।
    छंद वृद्धिंगत । वाचनाचा ॥९॥
    मोबाईल आज । गरज काळाची
    साथ जीवनाची। देत असे ॥१०॥
    गुगलचा मँप । मदत करतो।
    मार्गदाता होतो। वाहकाचा ॥११॥
    कोणतेही कार्य। असो कामकाज।
    मोबाईल आज। वरदान ॥१२॥
    -प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
    अमरावती
    भ्र.ध्व.:-८०८७७४८६०९
    Email :arunbundele1@ gmail.com

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,