• Tue. Sep 19th, 2023

बैल हावोत मालक..…

बैल हावोत मालक आम्ही

मानूस नाई विश्वासघाती ।
खातो त्याचे गुन रोज गातो
मातीशी हाय आमची नाती ।।
चारा खातो मालक आम्ही
शेतात राब राब रोज राबतो ।
थकलो कितीबी थांबत नाई
शेत माऊली तं आम्हीच कसतो ।।
मालक नको आम्हाले गोड धोड
पिर्माचं हातच फिरवा पाठीवर ।
कशीन आम्ही तुमच्यासंग न थकता
जीवात जीव हाये आमच्या जोवर ।।
हरवू नोका हिम्मत तुम्ही तुमची
हायेत ना सर्जा, राजा सोबत ।
यंदा पीकपाणी नाई तं काय झालं
पुढच्या वर्षी करू आणखी कसरत ।।
गयाले गयफास लावसान तं मंग
आमची कायजी कोन करन? ।
लेकरं बाळं तुमचे ओ मालक
रस्त्यानं नाई का भिक मांगन ।।
पोयाले नोका सजवू आम्हाले
तुम्हीच फकस्त आनंदी रहा ।
कसतानी वावरात रोज आम्हाले
पन तुमच्या डोयाने आनंदाने पहा ।।
मालक ट्याक्टरले कायले यिन हो
सांगा ना आमची कवातरी सर ।
निर्जीव हाये थो उलटून पळन
कवाईबी तुमच्या छातीवर ।।
द्या वचन तुम्ही आम्हाले मालक
एवढंच यंदाच्या या बैलपोयाले ।
कसता कसता झिजून गेलो तरी आम्ही
आम्हाले विकू नोका कसायाले ।।
शब्दसखा-अजय रमेश चव्हाण,
तरनोळी
ता.दारव्हा, जि.यवतमाळ
मो.८८०५८३६२०७

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,