अमरावती : सामजिक चळवळीत सतत अग्रेसर असणारे स्थानिक डॉ. रवींद्र मुन्द्रे, महेंद्र मुन्द्रे यांचे वडील नारायणराव मुन्द्रे यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी अल्प आजाराने राहत्या घरी दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी सौ. ललिताताई, दोन मुले डॉ. रविन्द्र, महेन्द्र व मुली डॉ. पद्मलता तायडे, स्नेहलता भगत, जावई, नातवंडं असा बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या निधनाने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
त्यांचा अंत्यविधी आज दि. १० सप्टेंबर २०२१ ला महेंद्र मुन्द्रे यांचे निवासस्थान ओमलहरी कॉलोनी अमरावती येथून निघेल अंत्यविधी स्थानिक हिंदू स्मशानभूमी येथे दुपारी २.०० वाजता होणार आहे.
स्मृतिशेष नारायणराव मुन्द्रे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले, ही बाब आपल्या सर्व हितचिंतका करिता दुःखद आहे. स्मृतिशेष नारायणराव मुन्द्रे यांचे सामाजिक, धार्मिक, आर्थिक चळवळीत फार मोठे योगदान आहे. तसेच स्वकुटुंबावर मोठे शैक्षणिक, धार्मिक, सामाजिक स्वकर्तुत्वाने संस्कार दिले आहे, त्यांनी समाजाकरिता डॉ, प्रा.विचारवंत असे मार्गदर्शक आदर्श मुले घडविले, जे समाज हिताकरिता अहोरात्र सर्व पातळीवर काम करतात. या आदर्श कुटुंबावर दुःखद आघात झाला, सम्पूर्ण मुन्द्रे कुटुंबाने बुद्ध तत्वज्ञान स्वीकारले आहे. म्हणजेच सत्य स्वीकारले आहे. तथागत गौतम बुद्ध म्हणतात, जन्म आहे तर मृत्यू अटळ आहे. हे शाश्वत सत्य आहे, आपण सर्व मुन्द्रे कुटुंबाच्या सोबत सहभागी आहोत. स्मृतिशेष नारायणराव मुन्द्रे यांना भावपूर्ण आदरांजली..!
– गुणवंत देवपारे
स्मृतिशेष नारायणराव मुंद्रे सर यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले ही बातमी ऐकून खूप दुःख झाले. सर जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक होते त्यांचा व माझा चांगला परिचय होता. मी शिक्षण विभागात कार्यरत असताना सर माझ्याकडे कधी कधी यायचे त्यांची काही काम असली तर मला सांगायचे. त्यांनी सामाजिक क्षेत्रात खूप मोलाची कामगिरी केली आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर पतसंस्था अमरावती या संस्थेच्या उभारणीत त्याचा मोलाचा सहभाग होता, ते धम्म कार्याशी सुद्धा जुळले होते. त्यांनी आपल्या मुलांवर खूप चांगले संस्कार केले आहेत. त्याचाच परिणाम आहे की त्यांची दोन्ही मुलं आज समाज कार्यात सक्रिय आहेत, समाजाचे नेतृत्व करीत आहेत, समाजाला योग्य दिशा देत आहेत. सरांच्या दुःखद निधनामुळे समाजाची तसेच मुंद्रे परिवाराची खूप मोठी हानी झाली आहे. त्यांचे कुटुंबियांना या दुःखातून सावरण्यासाठी मी मंगल कामना करतो. व्यक्तिशः माझ्याकडून माझ्या परिवाराकडून व सामाजिक एकता संघाकडून सरांना आदरांजली अर्पण करतो..!
- ए. बी. वरघट
- अध्यक्ष
- सामाजिक एकता संघ, अमरावती
निधनाची वार्ता ऐकून मन सुन्न झाले
जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झालेले नारायणराव मुन्द्रे यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनाची वार्ता ऐकून मन सुन्न झाले असून समाजाने एक सच्चा समाजसेवक हरविला आहे. नारायणराव मुन्द्रे यांचे समाज बळकटीकरणात फार मोठे योगदान आहे. त्यांच्या निधनाने समाजाचे फार मोठे नुकसान झाले आहे. समाजास नारायणराव मुन्द्रे यांना गमावल्याने फार मोठ्या वेदना होत आहे. समाजाच्या विचारसरणीला आणि आदर्शांना बळकटी देणारं आदर्श नेतृत्व होते. त्यांच्या जाण्याने आपल्या सर्वांचं नुकसान झालं आहे. मी त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.
- बंडूकुमार धवणे
- गौरव प्रकाशन, अमरावती