जन्म समुदयात माझे दिलदार प्रिय प्रसाद युक्त वतीने अंतकरणानी स्नेह बंधनाचा मिलाफ घडवून आणावया असे माझे प्रिय डॉ. प्रा. श्री मोतीराज चव्हाण सर,
शिक्षक दिनी योगायोगाने 5 सप्टेंबर रोजी सरांचं 50 वा वाढदिवस. जलाशयात खडा फेकला असता जसे असंख्य तरंगे निर्माण होतात तसेच मला नेहमी वाटे, कधीतरी चव्हाण सराबद्दल आपले विचार व्यक्त करावे किंवा थोडे लिहावे अन् तोच दिवस आज माझ्यासाठी उगवला..
खरे पाहता जी माणसं दुसऱ्याच्या सुखासाठी प्रयत्न करतात ती कधीच एकटी नसतात सरांच्या बाबतीत ही गोष्ट तंतोतंत लागू पडते सरांचा साधा स्वभाव हा काही लोकांना भलेही खटकत असला तरी त्यांचा तो कमीपणा नसून ते त्याचे संस्कार आहेत.
त्यांचे म्हणणे उत्तम वागणूक आणि चांगले विचार हे आपल्याला आई वडील यांनी शिकवलेल्या संस्काराचे उत्पादन आहे असे ते नेहमीच म्हणतात.
माझ्या पाहणीत सरांनी आज पावेतो कितीतरी मुलांना चांगले शिक्षण देऊन त्यांना घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. उदाहरण सांगायचे झाल्यास त्यापैकी श्री गोकुळ सिंग राठोड हा पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहे. सरांच्या कार्यात त्यांच्या सहचरिणी पद्मा बाईचा लाखमोलाचा वाटा आहे. सरांच्या मार्गदर्शनात स्थानिक भिवापूर येथील पिंकी चिरडे ही विद्यार्थिनी प्रशासकीय सेवेत आज कार्यरत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील एका छोट्याश्या निमखेडी या गावात जन्मलेले प्राध्यापक मोतीराज चव्हाण सर, नागपूरला शिक्षणासाठी आले उच्च शिक्षण घेत असताना भिवापुर महाविद्यालय भिवापुर आस्थापनेत सरांना 1996 ला शिकवण्याची संधी माजी मंत्री तथा संस्थेचे सचिव माननीय श्री राजेंद्र मुळक साहेब यांनी दिली त्या संधीचं सोनं सरांनी करून दाखवलेला आहे.
कर्तव्यनिष्ठ प्राचार्य श्री जॉर्ज सरांनी राष्ट्रीय सेवा योजना ची धुरा चव्हाण सरांकडे सोपवून दिली आणि जॉर्ज सरांच्या मार्गदर्शनात.. चव्हाण सरांनी तिथूनच कामाचा श्रीगणेशा केला 2001 ते आज पर्यंत सर राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी म्हणून आपले कार्य विविध कार्यक्रमाचे आयोजन करून चोख पद्धतीने बजावत आहे..
काम कोणतेही असो काम करण्यात ते कधीच कमीपणा समजत नाही. आज भिवापूर महाविद्यालयात जे सर्वदूर हिरवी गार झाडे दिसतात त्यात सरांचा सिंहाचा वाटा आहे.
आज पर्यंत महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजने च्या कार्यकाळात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करून त्यात आजपर्यंत 905 रक्तदात्यांचा यशस्वी सहभाग नोंदवून गरजूंना रक्त पुरविला आहे. हरित क्रांतीचे प्रणेते महानायक वसंतरावजी नाईक यांच्या प्रेरणेने समाजासाठी सरांचे कार्य उल्लेखनीय आहे.
मी भिवापूर ला राष्ट्रीय विद्यालयात कलाशिक्षक पदावर रुजू झाल्यापासून सरांचे अन माझे नाते जिव्हाळ्याचे आहे. आयुष्यात माझ्या, काहीलोक मला देवा सारखीच लाभलेली आहे. चव्हाण सर त्यापैकी एक आहे. जीवनात माझा एकदा निर्णय चुकला होता. तो निर्णय सरांनी हाणून पाडून नवी दिशा दाखवली नाहीतर जीवनाची माझी दशा झाली असती. तेव्हापासून ते माझे उत्तम मार्गदर्शक ठरले आहे.
माझ्या पाहणीत महाविद्यालयात 2005 यावर्षी नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करून त्यात 41 रुग्णाची मोफत शस्त्रक्रिया घडवून आणली होती. तसेच सरांनी दोन वर्ष विभागीय समन्वयक म्हणून उल्लेखनीय कार्य केले आहे.
कार्य करत असताना प्राचार्य जोबी जॉर्ज सरांच्या मार्गदर्शनात आरोग्य शिबिराचे आयोजन करून शिबिरात आजपर्यंत 3518 रुग्णांनी लाभ घेतलेला आहे हे विशेष. सरांना सांस्कृतिक कार्यक्रमांची आवड असून महाविद्यालयात माझ्या मार्फत नृत्य प्रशिक्षण घेऊन विद्यार्थ्यांचे नृत्याचे कार्यक्रम आयोजित केलेले आहे. 2010 मध्ये महाविद्यालयात विद्यापीठ स्तरीय रासेयो शिबिर घेऊन मार्गदर्शनासाठी स्थानिक व बाहेरील प्रशासकीय अधिकारी यांना बोलावून शिबिर यशस्वी केले आहे.या कार्याची दखल घेऊन नागपूर विद्यापीठाने प्रा. डॉ.मोतीराज चव्हाण सरांना उत्कृष्ठ कार्यक्रम अधिकारी पुरस्कार जाहीर केला होता पुरस्कार स्वीकारत असताना सोबत महाविद्यालयाचे प्राचार्य जॉर्ज सरांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता हे प्रत्यक्ष मी बघितले आहे.
कार्य करत असताना सरांनी आई वडिलांच्या सेवेत कधी खंड पडू दिला नाही आई वडिलांची तब्येत ढासळली असताना मनाची परिस्थिती नाजूक असताना सर कधीच मनाने खचले नव्हते त्याही काळात सरांनी आपले कार्य सदोदित ठेवले होते.
सरांनी 2011 मध्ये महाविद्यालयात प्रादेशिक स्तरीय रासेयो शिबिर यशस्वी करून दाखवले होते हे सर्व करत असताना सरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता.
सरांनी बंधुप्रेम जोपासला असून वडील बंधू च्या माध्यमातून महाविद्यालयात सुप्रसिद्ध लेखक अजीम नवाज राही यांना बोलावून मार्गदर्शनपर कार्यक्रम घेतले होते हे सर्व करत असताना महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक याचे सरांना सहकार्य मिळाले आहे सहकार्य शिवाय व्यक्ती पुढे जाऊ शकत नाही.
2019 राज्यस्तरीय रासेयो शिबिराचे यशस्वी आयोजन करून सरांनी महाविद्यालयाचा मान उंचावला होता,भिवापूर सारख्या छोट्या तालुक्यात महाविद्यालयामार्फत एड्स जनजागृती,वृक्ष लागवड वृक्ष संवर्धन,साक्षरता अभियान, व्यसनमुक्ती, सौचालय निर्मिती,बंधारा निर्मिती, श्रमदान,स्वच्छ भारत अभियान,जल संवर्धन, ऊर्जा बचतीचे महत्व, रॅलीचे यशस्वी आयोजन श्री चव्हाण सरांच्या माध्यमातून झालेली आहेत याचे साक्षीदार विद्यार्थी तथा भिवापूर नगरीचे नागरिक आहेत.
तसेच कोरोना विषाणू महामारी बिमारी रोखण्यासाठी भिवापूर तालुक्यातील जनता संकटात असताना कोरोना काळात भिवापुरचे दैनिक लोकमत चे वार्ताहर श्री शरद मिरे व विद्यार्थ्यांना घेऊन ” जन जागरण” अभियान सरांनी राबविले होते “टोचाल तर वाचाल” हे ब्रीद वाक्य घेऊन पोस्टर्स व प्रसार माध्यमातून आतापर्यंत 3000 लोकांपर्यंत कोरोना जागृतीचा संदेश सरांनी दिला आहे.या सर्व कार्याची दखल सर्व वृत्तपत्रांनी घेतलेली होती.
असे प्रा.डॉ.मोतीराज चव्हाण सर बुलढाणा जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात जन्म घेऊन नागपूर जिल्ह्यातील भिवापूर येथील भिवापूर महाविद्यालयाचे नाव उच्च स्तरावर पोहचविण्यात सरांचा मोलाचा वाटा आहे.
व्यसनापासून कोसोदुर असलेल्या अशा प्रतिभावान शिक्षकास शतशः नमन करून त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा देतो.
श्री चव्हाण सरांची
अशीच उत्तरोत्तर प्रगती व्हावी, सरांची ईच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात, सरांना उत्तम आरोग्य लाभावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना करून ” शिक्षक दिनी”सरांना 50 व्या वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा देऊन इथेच थांबतो..
धन्यवाद…!
– सुरेश राठोड
( कलाशिक्षक)
राष्ट्रीय विद्यालय,भिवापूर.
ता.भिवापूर जिल्हा नागपूर.
9765950144.