• Thu. Sep 28th, 2023

गोर बंजारा समाजातील घटस्फोट : एक सामाजिक गंभीर समस्या !

    न्याय नाही बाईला सन्मान येते गायीला
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की महिलांच्या अधोगतीला मनु जबाबदार आहे
    ================================

    भारतात सिंधु संस्कृती फार प्राचीन आहे. सुमारे दहा हजार वर्षांपूर्वी मातृसत्ताक कुटुंबपद्धती होती. महिलांनी शेतीचा शोध लावला. महिला घरबांधणी आणि वैद्यकीय कार्यामध्ये प्रगती वर होत्या .नंतर भारतावर आर्यानीं चार हजार वर्षापूर्वी आक्रमण केले.सर्व मूळ भारतीय महिलांना गुलाम आणि त्यांना स्वतंत्र अधिकार दिले नाही. मनुस्मृतीमध्ये सर्व महिलांचे अधिकार व स्वातंत्र्य नाकारण्यात आले. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. की महिलांच्या अधोगतीला मनू जबाबदार आहे .एवढेच नाही मनु म्हणतो की स्त्रियांना कधीही स्वातंत्र्य देऊ नये आता मनुस्मृति काय म्हणते पाहूया. ब्राह्मण साहित्यात मुलींचा जन्म कुटुंबासाठी त्रासदायक ठरवण्यात आला. ऐतरेय ब्राह्मणाच्या सातव्या अध्यायातील अठराव्या खंडात त्यांचा उल्लेख आढळतो.

    Thank you for reading this post, don't forget to subscribe!

    सखा ह जाया कूपणंही
    दुहीताज्योतिहि पुञ: परमे व्योमन

    अर्थ — मुलांचा जन्म कुटुंबासी आशादायक असून मुलीचा जन्म हा त्रासदायक आहे. यावरून असे दिसते की अर्थवेदा च्या काळापासून स्ञियाच्यां सामाजिक जिवनाची घसरण सुरू झाली. मनुस्मृतीत महिलांना स्वातंत्र्य नाही. पारतंत्र्यांचे एक प्रकारचे घोषणापत्र आहे.

    बालया वा युवत्या वा
    वूद्धया वापि योषिता।
    न स्वातन्त्रयेण कर्तव्यं
    किञित्कार्य गूहेष्वषि।।५–१४७।।

    अर्थ — बालिका असो की युवती किंवा वृद्ध स्त्री स्वातंत्र्यपणे घरातील काम करू शकत नाही .बरे एवढ्यावरच मनुस्मृति थांबत नाही तर …..

    बाल्ये.पितुर्वशै तिष्ठेत्पाणिग्राहस्य.यौवनै।
    पुत्राणां भर्तरि.प्रेते न
    भजेत्स्त्री स्वतन्त्रताम ।।५–१४८।।

    अर्थ –बाल्या काळात स्त्रीने वडिलांच्या, तारुण्यात पतीच्या तर पतीच्या मृत्यूनंतर पुत्राच्या अधीन राहावे. तिने स्वतंत्रपणे कधीच राहू नये. कारण स्त्रियांनी बंड करू नये म्हणून त्यांना सामाजिक निंदा नालस्तीचा धाक दाखवण्यात आला आहे.

    पित्रा भर्त्रा सुतैर्वापि नेच्छेद्धिरहमात्न:।
    एषां हि विरेहण स्त्री
    गर्हो कुर्यादुभे कुले।।५-१४९।।

    अर्थ –स्त्री ने पिता पती किंवा पुत्र पासून वेगळे राहण्याची इच्छा बाळगणे. कारण त्यांच्या पासून वेगळी राहणारी स्त्री ही पती कुळ आणि पितृ कुळ दोन्ही कलंकित करते .म्हणून स्त्रियांना भटकण्या साठी किंवा विचार करण्याची व अन्य कामात लक्ष देण्याची वेळ मिळू नये .म्हणून त्यांना सदैव घरगुती कामात जुपन ठेवण्याची आज्ञा मनुस्मृति देते.

    अर्थस्य संग्रहे चैना
    व्यये चैव नियोजयेत।
    शौचे धर्मे$त्रपत्कयां च
    पारिणाहास्य वेक्षणे।।९–१२।।

    अर्थ– रुपये पैसे सांभाळणे, खर्च करणे, शरीर व उपभोग्य वस्तूची साफसफाई धुणी भांडी करणे .भोजन तयार करणे, आणि घरातील सर्व सामान याची देखभाल करण्याच्या कामात स्त्रीयांना गुंतवून ठेवावे. मनुस्मृतीने स्त्रियांच्या अधिकाराला महत्त्व दिले नाही. एखादा मालक जशी आपली गाय विकतो .तशी स्थिती महिलांची मनुस्मृतीने करून ठेवली आहे.

    यस्मै दद्यात्पिता.त्वेना
    भ्राता वानुमते पितु:।
    तं शुश्रूषेत जीवन्तं
    संस्थितं च न लक्षयेत।।५–१५१।।

    अर्थ — पिता किंवा पित्याच्या अनुमतीने भावाने कन्येचा हात ज्यांच्या हातात दिला .तो जीवनभर शुद्ध हद्ययाने स्त्रीने सेवा करावी. (पतीची) व त्यांच्या मृत्यूनंतर धर्माचे उल्लंघन करू नये.आपला पती निवडण्याचा अधिकार स्त्रीयांनां नाही. जो सिंधू .सभ्यतेच्या काळात होता .* पती कसाही असो त्याची मनोभावे सेवा करावी .जणू स्त्री यंत्रमानव आहे. यापुढे तर मनुस्मृतीने कहरच केला आहे. समस्त महिला वर्ग यांच्या भावभावना त्यांच्या आशा-आकांक्षा ची अगदी राख रांगोळी केली आहे. जिवंतपणी नरकयातना भोगायला लावणारा मनुस्मृतीचा हा आदेश पहा-

    विशील: कामवूत्तो वा
    गुणैर्वा परिवर्जित:।
    उपचर्य: स्त्रिया. साध्व्या
    सततं दैववत्पति: ।।५-१५४।।

    अर्थ — पती अनाचारी असो किंवा परस्त्रीगमन करणारा असो किंवा ज्ञान हिन साध्वी स्त्रीने सर्वदा देवाप्रमाणे आपल्या पतीची सेवा करावी.म्हणूनच मनुस्मृतीच्या काळात स्त्रियांच्या आशा-आकांक्षा कशा पायदळी तुडवल्या जात होत्या. याचे उत्तम उदाहरण या श्लोकात आढळते.

    मद्यपा$साधुवूत्ता च
    प्रतिकुला च या भवते।
    व्याधिता वाधिवेत्तव्या
    हिंस्त्रार्थघ्नी.च सर्वदा ।। ९–८०।।

    अर्थ — जर स्त्री दारू पिणारी, वाईट आचरण करणारी पतीचा आज्ञेच्या विरुद्ध वागणारी, कुष्ठ रोगी तापट आणि नेहमी अपरिमित खर्च करण्यारी असेल तर तीचा पती जिवंत असताना दुसरा विवाह करू शकतो. पण स्त्रिया आपला नवरा व्यभिचारी, दारूडा असला तरी दुसरा विवाह करत नाही. या मनुस्मृतीमुळे स्त्रियांकडे भोग वस्तू आणि दासी समजून तिला वागण्याची एक प्रकारची चुकीची परंपरा अस्तित्वात आलेली आहे. अलीकडच्या काळात पुरुषाने काबाडकष्ट करून घरसंसाराला लागणारे अर्थार्जन करून आणायचे. आणि स्त्रीने चूल आणि मूल सांभाळून दोघांनी संसाराचा गाडा हाकायचा ही आपली पारंपारिक कुटुंब व्यवस्था होती . मात्र बदलत्या काळात या कुटुंब व्यवस्थेचे स्वरूप बदलू लागले. मुली शिकु लागल्या।, आणि घरचा उंबरठा ओलांडून पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून प्रगतीची कास धरू लागल्या. *अर्थात तीच्या परिवर्तनाचे श्रेय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सारख्या. तत्कालीन समाजधुरीण कडे मोठ्या परिणामावर जाते. अनेक स्त्रियांनी विविध क्षेत्रात आपला जागतिक ठसा उमटला आहे .पण हेच पुरुषी संस्कृतीला खटकते .भारतीय संस्कृती जगाच्या पाठीवर महान असल्याचे आपण नेहमी म्हणतो. स्त्रियांना देवी मानतो. पण तिच्यावर अत्याचार मात्र थांबलेली दिसत नाही.

    ऐका मंत्रामध्ये जिथे नारीची पूजा केली जाते तेथे देवता वास करतात।

    असे ग्रंथात दिलेले असताना मात्र आपण त्याकडे दुर्लक्ष करून स्त्रियांचे अतोनात छळ करताना दिसते वर्तमानपत्र उघडले कि हुंडाबळी आत्महत्या आणि घटस्फोट च्या बातम्या पाहून मनाला प्रचंड वेदना आणि दुःख होते. हल्ली गोरबंजारा समाजात घटस्फोटांचे प्रमाण फार जास्त झाले आहे. जर दहा जोडप्याचे लग्न झाले असेल तर घटस्फोटाचे प्रमाण 50 टक्के आहे.यामध्ये डॉक्टर ,प्राध्यापक बडे अधिकारी किंवा इंजिनीयरचा जास्त प्रमाण आहे. बरं ही सुशिक्षित मंडळी विवाह करताना एक नव्हे चक्क 100 पेक्षाही जास्त मुली पाहून पाहून.हताश झाल्यानंतर मात्र थकून सोयरीक करतात .सोयरीक करताना हुंडा ही प्रमुख मागणी. 10 ते 15 लाख रुपये आणि पोरगी शिकलेली, शहरातली तिला बहिण नको.कारण बहिण असल्यास आपल्या संसारात लुडबुड करेल हे सर्व पाहिल्यावर लग्न थाटात आणि कपड्यांची रेलचेल ।असे यांची डिमांड असते .लग्नापूर्वी असे वाटतात की यांच्यासारख्या मोठ्या मनाची माणसे शोधूनही सापडणार नाही. लग्नाआधी गोड गोड बोलणारी मंडळी लग्नानंतर लगेचच सासरा अमरीश पुरी सासू ललिता पवार बनते. नवऱ्याचे सोडा शाला शक्ती कपूर तो. लग्नात डिजेवर थिरकणारे, हुंडा घेणारे बकवास लोक मात्र नववधूला या ना त्या कारणाने त्रास देण्यास सुरुवात करतात. तिच्या सासरच्या कुटुंबातील पुरुषापेक्षा स्त्रिया कडूनच अधिक छळ होतो .अर्थात स्त्रीच स्त्रियांवर अत्याचार करताना दिसते.कारण बहुतांश सासुबाई ही आता ही (जुन्या चालीची) संकट चतुर्थी ,मार्गशीर्ष एकादशी ,करणारी.’अति भक्ती चोरो का लक्षण’ यामध्ये दारू पिणारे सासरे परवडले पण माळकरी नको अशी अवस्था झालेली असते.

    अत्याचार करणारी स्त्री ही विसरून जाते की माझी मुलगी सुद्धा कोणाचीतरी सून आहे. लग्नाअगोदर हे हुंडा घेणारे बकवास लोक असे म्हणतात आम्ही सुनेला मुलीप्रमाणे वागू ? आमच्या घरी स्वयंपाकाला बाई? कपड्याला बाई? झाडजूड करण्याला बाई आहे. आपल्या मुलीला काहीच काम नाही. अशी गोड गोड भाषा वापरून हुंडा मध्ये पैसा, सोना ,चांदी आणि ट्रकभर सामान घेणारे हे एक प्रकारचे गुंडच म्हणावे लागेल. *चोर तरी आपल्या पोटापाण्यासाठी एखाद्या व्यक्तीचा खिसा कापतो. पण हे साले महाचोर दिवसाढवळ्या एका घराला राजरोसपणे हजारो माणसाच्या डोळ्यादेखत लुटतात. याला आपणच जबाबदार आहोत. या विषयावर सामाजिक संघटना, राजकीय नेते विचारवंत किंवा बुद्धिजीवी कोणीही बोलत नाही. हुंडाबळी कायदा आहे. पण येथे ठाणेदारच आपल्या मुलीला 25 लाख रुपये हुंडा देऊ करतो.? आणि एखाद्या न्याय देणारा माणुसच गुमान लग्नात हुंडयाची मागणी करतो.? अशी आपली समाज व्यवस्था आहे. बरे लग्न झाल्यावर एक माहिनाही होत नाही .लगेच सासरची मंडळी कुरकुर करू लागतात .हिचे घराकडे लक्ष नाही. अशी कुरकुर सुरु करतात .आणि सुनबाई पहिली पाहुणी गेली की भांडे घासणारी, कपडे धुणारी बाई बंद करून सगळा कामाचा भार सुनेवर देऊन हे बकवास लोक हळूहळू आपला रंग दाखविण्यास सुरुवात करतात. *(सगळे.सारखेच नसतात काही ठिकाणी मुली पण आपला रंग दाख वतात)* इकडे नवरा मुलगा सुद्धा झोपताना वेगळा त्रास देतो .काही ठिकाणी मुली शुद्धा त्रास देतात. हे न सांगण्यासारखे आहे. म्हणून एक कवियत्री स्त्रियांच्या. दुःखाबद्दल लिहिते-

    स्त्री जन्मा ही तुझी कहाणी ओठावर हसू डोळ्यात पाणी वरील दोन ओळींतच त्यांच्या जीवनातील वास्तव या कवीने मांडण्याचा खूप चांगला प्रयत्न केला आहे

    हुंडा मागताना या लोकांची बेशरम पणाची हद्द पहा .आम्ही मुलांच्या शिक्षणावर भरपूर खर्च केला आहे .पण मुलीला सुद्धा शिकण्यासाठी खर्च लागलेला आहे हे ते मात्र साफ विसरतात. मुलीचे लग्न करण्यासाठी कित्येक बापाला आपली शेती घरे विकून हुंडा देऊन लग्न करावे लागते मुलीचे लग्न करताना मुलीच्या बापाची काय अवस्था होते. हे ज्यांना मुली आहेत त्यांनाच माहीत पण समाज आंधळा आणि बहिरा झालेला आहे. याकडे कोणाचेही लक्ष नाही. साधारणता घटस्फोटाचे अनेक कारणे देता येईल पण काही महत्त्वाची कारणे अशी आहेत.

    नवरा मुलगा आणि मंडळी कडील कारणे
    १. नवरदेवाचे आई-वडील अनाडी जुन्या चालीचे अंधश्रद्धाळू असणे.
    २. मुलांचे उशिरा लग्न करणे 32 ते 33 वर्षात त्यामुळे बाहेरील मुक्त जीवनामुळे लग्नातील इंट्रेस्ट कमी होतो.
    ३. मी एक अधिकारी आहे .त्यांचा अहंकार अहंभाव आणि मी पणा. सामान्य नागरिक जरी असला तरी मी पुरुष आहे ही मानसिकता?
    ४. बायकोही माणूस आहे तिला समानतेची वागणूक देण्याविषयी मनात कटूता.
    ५. तडजोड करण्याची वृत्तीचा अभाव ६) बाहेरख्यालीपणा किंवा दारूचे व्यसन.
    ७. सासऱ्याकडून सतत काहीतरी मिळेल याची लालसा.
    ८. सतत मुली होणे वैज्ञानिक दृष्ट्या याला पुरूषच जबाबदार असतो.
    ९. मुलीवर संशय घेणे. सततची मारझोड.
    १०. अनर्सेगीक कुत्यासाठी भाग. पाडणे. अशी बरीच कारणे आहेत.
    नवरी मुंली आणि मंडळी कडील कारणे
    १. मुलीचे हायपर एज्युकेशन किंवा नोकरी, मी माझ्या पायावर उभी असण्याचा अंहभाव।
    २. माझ्या वडिलांनी हुंडा देऊन आपल्याला विकत घेतला आहे. हे सतत चे टोमणे मारणे.
    ३. मुलीच्या आईवडिलांची वाजवीपेक्षा हस्तक्षेप जास्त.
    ४. उशिरा लग्न होत असल्यामुळे पुरुषा विषयी असलेली निगेटिव्हिटी.
    ५. मी आणि माझा नवरा यापलीकडे घरात तिसरा नको ही मूर्ख मानसिक स्थिती विकृती.
    ६. आमदनी अठन्नी आणि खर्चा रुपया कडे जास्त कल.
    ७. मुलबाळ न होणे.
    ८. चिडचिडेपणा भांडकुदळ स्वभाव
    ९. नवऱ्यावर विनाकारण संशय घेणे.सासरच्या मंडळी कडील नातेवाईकाचा मानसन्मान न करणे.
    १०. नवऱ्याच्या अंगावर चाल.करून जाने नवऱ्याला फडतूस. समजणे. नवऱ्या समोरच मित्राशी मैत्री ठेवणे. मोबाईल चा. अति वापर. अशी अनेक. कारणे आहेत.

    या व अशा अनेक कारणांनी आज घटस्फोटाचे प्रमाण फार वाढताना दिसत आहे. ही फार चिंताजनक बाब आहे. न्याय नाही बाईला सन्मान येथे गायीला अशी अवस्था झालेली आहे. भारताचा विचार केला तर गाईला आई म्हणून तिचे संरक्षण करायचे परंतु बाई असेल तर फक्त तिला भोगायचे हे चित्र सध्या दिसत आहे. कोणत्याही गोठ्यातली गाय सुरक्षित आहे .पण बंगल्यातली, हवेलीतली बाई मात्र असुरक्षित आहे.(याला भांडकुदल आणि एककल्ली मुली अपवाद आहे) आपल्या घरात समोरून एखादी गाय गेली की आपण तिला स्पर्श करून मनोभावे वंदन करतो. पण आपल्या घरातील बाईचे महत्त्व.आपल्याला ओळखू येत नाही.तिला मात्र आपण बडवतो. काही रोज बडवणारी माणसे आपल्या आजूबाजूला वावरताना दिसतात . (काही ठिकाणी बायाच नवऱ्याला बडवतात पण हे प्रमाण अगदी नगण्यच आहे) कदाचित संत. तुळशीदासाच्या श्रोल्काचा पगडा आपल्यावर असेल..!”ढोल गवार शुद्र पशु नारी ये सब ताडन के अधिकारी” यामुळे स्त्रीचे शोषण झाले तिला भोगदासी बनवून ठेवल्या गेले आहे. अशा परिस्थितीत जीवन जगत असताना सुद्धा ज्या स्त्रियांचे दहावी बारावी मध्ये मुले मुली शिकत आहेत. अशा स्त्रियांना सुद्धा शुल्क कारणावरून घटस्पोट देणारी बरीच मंडळी आज समाजात दिसून येते. एका मोठ्या अधिकाऱ्याने त्याची मुले आणि मुली दहावी आणि बारावीला असताना आपल्या बायकोला घटस्फोट दिला .सुखासीन संसारातून ती बाई खेड्यात गेली .आणि नंतर ती आपल्या बाप भावाची बोज बनली. अशी अनेक उदाहरणे देता येईल. घटस्फोट झालेल्या स्त्रियांची करून कहाणी फार गंभीर आहे.

    एका स्त्रीला फोनवर कोणाशी बोलत आहे. तिने सांगितले माझ्या मित्राशी तेवढ्यात कारणावरून डॉक्टर मुलांनी घटस्फोटाला सामोरे जावे लागलेले आहे .नवरा कुठेही रात्रभर शेण खाऊन घरी आला. तरी तो नवराच आहे. काही बेवडे तर आपल्या बायकोच्या छातीवर दुसरी बायको आणून घरात ठेवतात. तरीही आपल्या मुलाकडे आणि आई-वडीला कडे पाहून ती स्त्री आपल्या संसाराचा गाडा हाकते . *बऱ्याच ठिकाणी घटस्फोटाचे प्रमाण स्त्रियांचे बिमारीचे कारण असू शकते. तर काही ठिकाणी मुलं न होणे. पण नवरा जर बिमार पडला किंवा अपघातात , मृत्यू झाला तर मात्र बायको नवर्याला कदापिही सोडून जात नाही* मुलं न होणे हे पुरुषांचा दोष असतो. मात्र त्याची सजा मात्र स्त्रियांना भोगावी लागते. यामध्ये समाजाचे धुरकरी किंवा नातेवाईक स्त्रियांची बाजू घेताना दिसत नाही. याला समाजातूनच प्रचंड विरोध व्हायला पाहिजे? खरेच फारच मोठे कारण असेल तर घटस्फोट झाला .तर हरकत नाही .पण शुल्लक कारणावरून जर आपण घटस्फोट दिला किंवा घेतला तर सामाजिक चौकट उध्वस्त होईल. पंचवीस वर्षांपूर्वी एका डॉक्टर मुलींने आपला नवरा दारू पीत नाही, मोटारसायकल चालवत नाही. म्हणून घटस्फोट दिल्याचे आठवते? पण. वर्षभरात झालेल्या लग्ना पैकी 50 टक्के घटस्पोट होताना दिसत आहे.

    हे समाजव्यवस्थे साठी फार घातक आहे. बरं घटस्फोटाचे कारण फार मोठे नसताना सुद्धा हुंड्याच्या लालसेपोटी लोक घटस्फोटापर्यंत येतात.पण लग्नाच्या आधीच या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. कारण आपण ज्या स्त्रीला घटस्फोट देतो त्याची अवस्था नंतर फार खराब होते कारण कुमारी मुलीलाच लग्न करण्यासाठी प्रचंड त्रास होतो. तर घटस्फोटीत महिला कोण स्वीकारणार? तर आई-वडील असेपर्यंत ती त्या घरात राहू शकते. एखदा आई वडील गेले की भाऊ आणि भाऊजयीच्या तावडीत बिचारी लंबी होऊन जाते. त्यामुळे घटस्फोट झाल्यानंतर बऱ्याच मुलीचे कँरियर खराब होतात. किंवा ते लग्न करत नाहीत. हे जर विदारक, भयानक परिस्थितीत थांबवावची असेल तर घटस्फोट होता कामा नये.यासाठी सर्व समाजाने पुढाकार घ्यावे.

    विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिलामध्ये भारतातील सर्व हिंदू,ओबीसी, एससी, एसटी समाजाच्या महिलांना वडिलांच्या संपत्तीत वारसाहक्क,दत्तक घेण्याचा अधिकार, पोटगीचा अधिकार घटस्फोटाचा अधिकार ,आंतरजातीय विवाह करण्याचा अधिकार, देऊन दुसरे लग्न करणे गुन्हा ठरविला आहे. परंतु या कायद्याची अंमलबजावणी बरोबर होताना दिसत नाही. पण या कायद्यामुळे स्त्रियांना संरक्षण मिळाले आहे. स्त्रीरूपी दुर्गा व लक्ष्मीची आपण पूजा करतो .परंतु घरच्या लक्ष्मीला खूश ठेवत नाही. घराची लक्ष्मी आनंदी असल्यास घरामध्ये सुख शांती चा झरा वाहतो. स्त्रियांना एवढेच सांगणे आहे. की आपल्याला त्रास झाला की आई-वडिलांना व नातेवाईकांना विनासंकोच माहिती दिली पाहिजे. न घाबरता न डगमगता आई-वडिलांची संवाद केला पाहिजे .तर अशा अप्रिय घटना होणार नाही. मा जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, राणी लक्ष्मीबाई, राणी दुर्गा माता, सावित्रीबाई फुले, किरण बेदी, इंदिरा गांधी यांचे स्मरण नेहमी ठेवावे. भारतीय स्त्रियांबाबत अभिमानाने सांगतात.

    हम भारत कि नारी है फुल और चिंगारी है
    जय.सेवा …जय वंसत
    याडीकार पंजाब चव्हाण
    सुंदल निवास कदम लेआउट,
    श्रीरामपूर पुसद
    मो. नंबर📞95 52 30 27 97
    (संदर्भ– मा. भी.म .कौशल यांचे 1 मार्च आणि 2 मार्च 2021 रोजी दैनिक मतदार मध्ये प्रकाशित झालेले लेख)

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,