• Mon. Sep 18th, 2023

कै.वेणुताई पद्मने एक आदर्श व्यक्तिमत्त्व..!

  ========================

  सामाजिक बांधिलकी स्वीकारुन समाजात आदर्श निर्माण करणाऱ्या कै.वेणुताई पुंडलिकराव पद्मने यांच्या दि. २३ सप्टेंबर,२०२१ ला असलेल्या तेरवीनिमित्त कवी- लेखक प्रा.अरुण बुंदेले यांचा लेख वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत. -संपादक

  Thank you for reading this post, don't forget to subscribe!

  ========================

  पथ्रोट,जि.अमरावती येथील कै.विश्रामजी व कै.अनुसयाबाई वानरे यांची प्रेमळ व लाडकी सुकन्या, दैनिक प्रदर्शन व साप्ताहिक मानवक्रांतीचे संपादक श्री सुदाम वानरे सह चारही बंधुंचे शेवटपर्यंत बंधुप्रेम कायम ठेवणा~या आदर्श बहीण,लग्नानंतर पद्मने कुटुंबाची जीवनभर कष्टमय सेवा करून सासू सास~यांचे मन जिंकणा~या आदर्श स्नुषा , सुखात व दु:खात पतीदेवाची साथ देऊन त्यांचा संसार सुखी करणा~या आदर्श धर्मपत्नी,पाच मुलामुलिंचा योग्य सांभाळ करुन त्यांना सुसंस्कारित करणा~या आदर्श माता , तीनही जावायांना मुलाप्रमाणे समजून मुलिंचा संसार सुखी करणा~या आदर्श सासूआई,सर्व नातू व पणतुंना म्हातारपणातही जवळ घेऊन त्यांचे पूर्ण लाड पुरविणा~या आदर्श आजी माझ्या सासुआई कै.वेणुताई पुंडलिकराव पद्मने यांना विनम्र आदरांजली अर्पण करतो अाणि आज दि. २३ सप्टेंबर,२०२१ ला असलेल्या त्यांच्या तेरवी निमित्त त्यांचे अादर्श व्यक्तिमत्त्व शब्दबद्ध करण्याचा अल्पसा प्रयास करतो.

  “स्वभाव तो नम्र। वर्तन विनम्र।
  जीवनात सदा। आनंदी मन॥

  अशा विनयशील स्वभाव असलेल्या माझ्या सासुआई कै. वेणुताई पुंडलिकराव पद्मने या अमृतमहोत्सवी वर्षात वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी २०२‍ १ च्या सप्टेंबर मासातील अकरा तारखेला अल्पशा आजाराने जवाहर नगर ,अकोला येथे पंचत्त्वात विलिन झाल्या त्यावेळी त्यांचे पद्मने कुटुंब, माहेरचे वानरे कुटुंब आणि सामाजिक बांधिलकी स्वीकारुन त्यांनी जीवन जगताना ज्यांना ज्यांना साथ दिली , मदतीचा हात दिला असे सर्वच दु:खसागरात बुडाले. कारण सासुआईचे या सर्वांशीच प्रेमाचे नाते होते,स्नेह संबंध होते.

  “आनदि आनंद। प्रेमाच्या या घरी॥
  वाटे दारोदारी । वेणुताई॥”

  असा आनंद वाटण्याचा त्या प्रयत्न करीत.म्हणूनच त्यांच्या जीवनातील गोड स्मृतींचे स्मरण सर्वच करतील.कै.वेणुताई पुंडलिकराव पद्मने यांचा जन्म पथ्रोट,जि.अमरावती येथे १९४६ सालातील मे महिन्याच्या वीस तारखेला वारकरी पंथातील अध्यत्मिक वातावरणात झाला. कारण त्यांच्या मातोश्री कै.अनुसयाबाई आणि वडील कै.विश्रामजी वानरे हे वारकरी पंथातील अध्यत्मिक भक्त होते.अनेक धर्मग्रंथातील अोव्या व अभंग मातोश्रीच्या मुखोद्गत होते.घरी आलेल्या गरिबांना त्या समतेची वागणूक देऊन सढळ हाताने मदत करायच्या. मातोश्रीच्या जनसेवेच्या व अध्यात्मिक वातावरणात माझ्या सासुआई कै.वेणुताईंचे बालपण गेल्यामुळे त्यांनी पुढे लग्नानंतर स्वत:च्या आईवडिलांच्या सुसंस्कारांचा गोडवा आपल्या पाचही मुलांमध्ये वाटला व त्यांना घडविले आणि स्वत:च्या संसारासोबतच इतरांचाही संसार सुखी करण्याचा प्रयत्न केला.

  सासुआई कै.वेणुताई यांचे पती कै.पुंडलिकराव पद्मने हे Central Execise (केंद्रीय उत्पादन शुल्क) मध्ये Superintend (अधिक्षक) पदावर असल्यामुळे त्यांचे स्थलांतर व्हायचे. तेव्हा संसाराची जबाबदारी सासुआईवर यायची .नागपूर ,अमरावती व अकोला येथे संसारिक जीवन जगताना त्यांच्या दारी समस्या घेऊन आलेल्या गरिबांना त्या नेहमीच योग्य मार्गदर्शन करुन त्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करायच्या, वेळप्रसंगी त्यांना मदत करुन मातोश्रीचा वारसा जपण्याचा प्रयत्न करायच्या आणि त्यांना

  धरा सज्जनांची संगत ।
  सोडा दुर्जनांची सोबत ॥
  आदर्शाच माहेरघर।
  जीवन होईल तुमचं॥

  असे आदर्श जीवन जगण्याचे त्या मार्गदर्शन करीत . हेच जीवनतत्त्व स्वत:च्या मुलांना सांगून सुसंस्कार देऊन त्यांनी घडविले. त्यांच्या तीन मुलिंचा व दोन मुलांचा संसार सुखी होण्याचे रहस्य सासुआईंनी त्यांना दिलेल्या या सुसंस्कारात आहे, असे म्हणता येईल. त्या सुस्वभावी, मनमिळाऊ, स्पष्टवक्त्या,विनयशीलहोत्या. सासुआईंनी-

  मुलांना मुलिंना सुसंस्कार दिले।
  मार्गदाता होऊन जीवन घडविले॥

  सासुआईंनी आपल्या पाल्यांना, नातवांना इंजिनिअर, डाँक्टर, शिक्षक, प्रोजेक्ट मँनेजर होताना बघितलं. त्यांचा थोरला सुपुत्र श्री.राजेंद्र हा Central Railway मध्ये कल्याण येथे Sr.Section Engineer असून त्यांची कन्या कु.अनुष्का (नात)ही B.Sc. असून मुंबई ला P.G.D.M.,B.M. करीत आहे तर सुपुत्र चि.केयुर (नातू) हा नवीमुंबई येथील Terna Engg.College मध्ये Engineering ला आहे. सासुआईचा धाकटा सुपुत्र श्री संजय हा Nulife Company मध्ये Manager आहे तर त्याचा सुपुत्र (नातू) चि.सौम्य हा मुंबई येथे V.E.S.I.T . ला Engineering ला असून धाकटा चि. समृद्ध(नातू) हा सातव्या वर्गात शिक्षण घेत आहे.

  सासुआईची थोरली कन्या सौ. सुनिता एकनाथराव घुडे (पुणे) यांची थोरली कन्या सौ. अनुराधा अपूर्व कालरा (नात )ही I.I.M कलकत्ता येथून M.B.A. झाली असून ती बंगलोर येथील Deloitte Company मध्ये Senior Consultant या पदावर कार्यरत आहे.थोरला सुपुत्र श्री मयुर ( नातू)हा I.I.M. Kozhikode येथून M.B.A. झाला असून तो पुणे येथे Bajaj Finserv Company मध्ये Manager आहे तर धाकटी कन्या सौ डाँ.मेघा राहूल पिंपळकर (नात) ही नागपूर येथील V.S.P.M Dental College येथून B.D.S.झाली असून डाँक्टर आहे. मधली मुलगी सौ. ज्योती अरुण बुंदेले (अमरावती) ही B.Sc.,B.Ed,B.A.(Eng.Soc.),B.P.Ed.असून High School Teacher आहे तर त्यांचा थोरला सुपुत्र चि.सुमेध (नातू) हा I.I.M. कलकत्ता येथून M.B.A. झालेला असून तो अहमदाबाद (गुजरात) येथे Adani Group (Company) मध्ये Project Manager या पदावर कार्यरत आहे तर धाकटा सुपुत्र चि.साकेत (नातू) हा बंगलोर येथे Symbiosis College मध्ये M.B.A चे शिक्षण घेत आहे. सासुआईची धाकटी कन्या सौ.मालती अरविंदराव जाधव (ठाणे) B.Com. असून त्यांची थोरली कन्या कु.तन्वी (नात)ही I.I.T. Guwahati येथून B.Tech. झालेली असून ती Incrade Company मध्ये Project Manager आहे तर धाकटी कन्या कु.अनुजा (नात) ही V.I.T. Bombay येथून B.E. झाली असून ती America येथील Washington D.C.येथे M.S. करीत आहे.आपल्या या नातवांचे पुढिल यश बघायला आज त्यांच्या प्रेमळ आजी कै.वेणुताई आपल्यात नाहीत याचे खूप दु:ख नातवांसह सर्वच नातेवाईकांना होत आहे.

  कै.वेणुताईचे बंधू सामाजिक कार्यकर्ते श्री सुदाम विश्रामजी वानरे हे त्यांच्या मातोश्री कै.अनुसयाबाई वानरे व भगिनी कै.वेणुताई यांच्या सामाजिक बांधिलकिचा वारसा पुढे चालविण्याचा प्रयास करीत आहेत. ते दैनिक प्रदर्शन व साप्ताहिक मानवक्रांतीचे संस्थापक संपादक असून या वृत्तपत्राच्या माध्यमातून ते आपली सामाजिक चळवळ शहरातच नव्हे तर ग्रामातील झोपडीपर्यंत अाज पोहोचवित आहेत अाणि ते महाराष्ट्र चर्मकार संघटनेचे अध्यक्ष असून या माध्यमातून अमरावती येथील सर्वोदय काँलनी, बेलपुरा , तोंडगाव आणि बेलोरा ता .चांदूर बाजार येथे संत रविदास सांस्कृतिक भवन उभारण्यामध्ये श्री सुदाम वानरे यांचा सिंहाचा वाटा आहे. गटाई कामगार रस्त्याच्या कडेला बसून काम करायचे त्यांची समस्या लक्षात घेऊन शासनाला मागणी करून विदर्भासाठी ५१ लाखाचा निधी मिळवून समाजातील गरिबांना स्टाँल उपलब्ध करुन दिले.शासकीय चर्मोद्योग विकास महामंडळाला संत रविदासांचे नाव देण्याच्या त्यांच्या मागणीला शासनाने पूर्ण करुन “संत रविदास चर्मोद्योग विकास महामंडळ” असे नाव दिले.

  माझ्या सासुआई कै.वेणुताई पुंडलिकराव पद्मने यांनी जीवन जगताना कन्या,भगिनी,पत्नी,स्नुषा,माता,सासू, आजी या सर्व भूमिका चोखपणे बजावून समाजात एक आदर्श निर्माण केला.

  पुर्तता या जीवनाची ।
  माझ्या मृत्युत व्हावी ॥
  जीवनापासून माझ्या ।
  मला मुक्ती मिळावी ॥

  अशी विचारधारा असलेल्या आदर्श व्यक्तिमत्त्वाच्या धनी कै.वेणुताईं पुंडलिकराव पद्मने यांनाआज असलेल्या त्यांच्या तेरवीनिमित्त मी विनम्र आदरांजली अर्पण करतो…!

  -प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
  रुक्मिणी नगर,अमरावती.
  भ्र.ध्व.:-८०८७७४८६०९
  Email ID: arunbundele1@gmail.com

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,