• Mon. Sep 25th, 2023

“आला पोयाचा सन “

आला पोयाचा गा सन

करा बैलाचा सन्मान
तेल पैसाच्या देठानं
शेका बयलाचे खान !
लोनी हयदीचा लेप
लावा बैलाच्या खांदाले
आज आवतन घ्याहो
उद्या येजा जेवानाले !
आना न्हाऊन धुवून
पोटभरून चारून
बांधा चवरं मथाटी
घाला चवाये वरून !
रंग लावून शिंगाले
नक्षीकाम बेगळाचे
बांधा शिंगाले बाशींग
गळा माळ घुंगराचे !
साज लेऊन नवीन
बैल झाला नवरदेव
घास पुरनपोयीचा
खाऊ घाले नामदेव !
त्याले नमन करून
त्याचा उतराई होऊ
सर्जा चालला पोयात
आता तोरनात जाऊ !
तोरनात येकमेका
गयाभेट घेई सारे
बैल मखराचा येता
वाहे अनंदाचे वारे !
सन्मान सोहळा पाहून
आसू डोयातनी येती
कृतज्ञता व्यक्त करी
बैल मालकाच्या प्रती !
– अरूण विघ्ने

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,