Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

भकास गावाची श्रीमंती..!

    भंगलेल्या भिताडाची
    सांगतो ऐका कहानी
    जुन्या श्रीमंत गावाची
    दिसते जिवंत निशानी
    तुटला जरी साखळकोंडा
    तरी सौख्य नाही तुटले
    दोराने का होईना नाते
    एकमेकांशी घट्ट बांधून ठेवले
    कुरतडले जरी वैभव वाड्याचे
    रखवालदार अजून ताठ आहे
    दाराजवळील रुबाबात बाकडे
    आदरातिथ्यासाठी सज्ज आहे
    मोडून पडला रुबाब जरी माझा
    अजून शाबूत आहे माझा कणा
    फक्त पाठीवरती हात असू द्या
    नित्य असाच असेल ताठ बाणा
    -अरुण विघ्ने
    (चित्र सौजन्य संदीपजी धावडे दहिगावकर)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code