Featured Post

Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

तक्षशिला महाविद्यालयात स्वातंत्र्यदिनी 'संवाद क्रांती' विशेषांकाचे प्रकाशन

    सचिव प्रा. पी.आर.एस.राव यांच्या हस्ते झाले झेंडावंदन

    अमरावती : श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टद्वारा संचालित तक्षशिला महाविद्यालयात स्वातंत्र्यदिनी संवाद क्रांती विशेषांकाचे प्रकाशन नुकतेच झाले. सुरूवातीला संस्थेचे सचिव प्रा. पी.आर.एस.राव यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत व स्वतंत्र भारताच्या संविधानातील उद्देशिकेचे सामुहिक वाचन झाले. उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिल्यानंतर पत्रकारिता व जनसंवाद विभागामार्फत प्रात्यक्षिकाचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी काढलेला विशेषांक 'संवाद क्रांती'चे प्रकाशन संस्थेचे सचिव प्रा. पी.आर.एस.राव, प्राचार्य मल्लू पडवाल यांच्या हस्ते करण्यात आले.

    तक्षशिला महाविद्यालयातील पत्रकारिता व जनसंवाद विभागामार्फत दरवर्षी 'संवाद क्रांती' विशेषांक काढला जात असून यंदाचे हे सातवे वर्ष होते. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून कोविडच्या काळातही विभागातील भावी पत्रकारांनी आपले प्रात्यक्षिक मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टंन्सचे पालन करून पूर्ण केले याचे मला कौतुक वाटत असल्याचे मत सचिव प्रा. पी.आर.एस.राव यांनी व्यक्त केले. 'संवाद क्रांती' विशेषांकामध्ये महाविद्यालयात वर्षभरात झालेल्या कार्यक्रमांच्या बातम्या, व्यक्तीविशेष, दिनविशेष, कविता, अमरावती शहराचा इतिहास, छ.शिवाजी महाराज यांचे कार्य, आरोग्य टिप्स, वेगवेगळया विषयांवर लेख आदी विद्यार्थ्यांचे साहित्य प्रकाशित करण्यात आले. यावेळी नितीन इंगळे, विक्की बाभूळकर, निकीता राऊत, पवन कैथवास, प्रफुल वानखडे, शिवानी ठाकूर, रोहन गुडधे, योगेश श्रीवास्तव, जयकुमार पुनसे, प्रियंका सुरोशे, गिरीष नागदिवे, किर्ती इंदूरकर, सुमित गांजरे, ऋतूराज आठवले, प्रथम इंगळे, संघर्ष लौकरे, शुद्धोधन गडलिंग, सुजल दामोदर आदी विद्याथ्र्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार डॉ. कमलाकर पायस यांनी मानले. पत्रकारिता व जनसंवाद विभागातील विद्यार्थी प्रतिक्षा तसरे, सर्वेश बागडे यांनी 'संवाद क्रांती'चे प्रकाशन झाल्यानंतर उपस्थितांना अंकाच्या प्रतींचे वितरण केले.

    स्वातंत्र्यदिनी आयोजित या कार्यक्रमाला डॉ. रविंद्र तायडे, डॉ. संजय देशमुख, डॉ. अंजली वाठ, डॉ. वर्षा गावंडे, डॉ. प्रणाली पेठे, प्रा. विलास फरकाडे, प्रा. स्नेहा वासनिक, प्रा. अमित त्रिवेदी, प्रा. सचिन पंडीत, प्रा. प्रितेश पाटील, प्रा. प्रविण वानखडे, आकाशी सरवटकर, प्रा. एस.डी. श्रीखंडे, अनिकेत माथने, दर्शना चव्हाण, प्रा. मयूरी तट्टे यांच्यासह अनिल चौधरी, देवेंद्र कानडे, योगेश मानकर, भूषण राऊत, प्रशांत मारोडकर, संतोष खोब्रागडे, उमेश अरगुलेवार, राज सुरवाडे, किशोर केचे, ए. डी. बोडखे, एस. वाय. भालेराव, के.एल. गायधने, टी. ए. माकोडे, मंगेश वाघ, एस. एम. नाईक, आर.ए. तरोडकर, सुजल वानखडे आदींची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code