दारव्हा : विनाअनुदान तत्वावर एका झाडाखाली सुरू केलेली शाळा ते पाच एकराच्या परिसरात उभारलेली टुमदार ऊत्तुंग इमारत, आपल्या संपूर्ण सेवाकाळात ज्याने पाच दिवसाचे वर रजा घेतली नाही. ज्याने उन्हाळी सुटी, दिवाळी सुटी वा रवीवारची सुटी पाहीली नाही, आपल्या सेवाकाळात ज्याने शेकडो गुणवंत विद्यार्थी समाजाला दिले , शाळेसाठी सर्वस्व बहाल केलेल्या एका हरहुन्नरी शिक्षकाचा नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने संपूर्ण संस्थेच्या वतीने आज भावपूर्ण निरोप देण्यात आला.
मोहनराव जाधव (स. शि. बाबनाजी महाराज विद्यालय मांगकिन्ही) हे त्या गुणवान शिक्षकाचे नाव. निरोप सभारंभाला पोहरादेवी धर्मपिठाचे महंत तथा शाळचे मुख्याध्यापक आ. सुनील महाराज राठोड, कोंडोली येथील बाबनाजी महाराज महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. अनामिका राठोड, दार०हा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मा.विलास जाधव, गावाचे सरपंच संजय राठोड तथा अनेक गणमान्य नागरीक उपस्थित होते. शाळा समुह केंद्र मांगकिन्हीच्या वतीनेही केंद्रप्रमुख संजय बिहाडे व केंद्र मुख्याध्यापक शत्रुग्न च०हाण यांनी शाल श्रीफळ व भेटवस्तु देऊन त्यांचा सपत्नीक सत्कार केला.मनोगत व्यक्त करतांना अनेकांनी श्री. मोहन जाधव सरांच्या सेवाकाळातील अविस्मरणीय प्रसंगांना उजाळा दिला. सत्काराला उत्तर देतांना श्री जाधव सरांनी कर्त्यव्यासी प्रामाणीक राहून नौकरीच्या शेवटच्या क्षणापर्यत माझी शाळा हेच सर्वस्व मानून निस्वार्थपणे सेवा केल्याचे मनोगत विशद केले.जाधव सरांच्या घवघवीत कार्याची पावती म्हणून संस्थेने त्यांना शाळेचे कार्यवाहक म्हणून लगेच नियुक्ती दिली. व भावी आयुष्य सुखासमाधाचे आरोग्यमय जावो अशी मनोकामना व्यक्त केली.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या