सलामी
स्वातंत्र्याचे स्वप्न पाहुनी देशासाठी शूरवीर लढले
प्राणपणाने झुंज देवुनी हक्कासाठी पेटून उठले
अर्पण करुनी सर्व सुखाला घरदारेही सर्व त्यागले
परकीयांच्या बंधनातुनी मुक्त शूरांनी देशा केले
मायभूमिच्या प्रेमापोटी धरतीवरती रक्त सांडले
तिलक लावुनी स्वातंत्र्याचा भूमातेचे रक्षण केले
गाथा लिहुनी बलिदानाची इतिहासाचे पान लिहिले
जागृत करुनी लोक मनाला देशप्रेमाचे बीज रुजविले
अत्याचारी जुलमी सत्तेला संपविण्या रण पुकारले
क्रांतीकारी हसत मुखाने मातीसाठी शहीद झाले
दिवस उगवला सोनियाचा शूरवीरांच्या रणनीतीने
देवु सलामी कर्तृत्वाला, स्वातंत्रदिनी अभिमानाने
0 टिप्पण्या