अमरावती : श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टद्वारा संचालित तक्षशिला महाविद्यालय येथे डॉ. एस.आर. रंगनाथन जयंती आभासी पद्धतीने साजरी करण्यात आली. त्या निमीत्त ग्रंथालय व आयक्यूएसी विभागातर्फे 'ऑनलाईन स्पर्धा परीक्षेची पूर्व तयारीÓ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी संस्थेचे सचीव प्रा. पी.आर. राव तर प्रमुख अतिथी म्हणून तक्षशिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मल्लू पडवाल यांची उपस्थिती होती.
सुरूवातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्मृतीशेष दादासाहेब गवई, डॉ. एस. आर. रंगनाथन यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. प्रा. राव यांन विद्याथ्र्यांना सांगीतले की, आपणास स्पर्धा परिक्षा देतांना सर्वच विषयांचे बेसीक नॉलेज असणे आवश्यक आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व मार्गदर्शक सहायक आयुक्त भूमिसुधार, अमरावती श्यामकांत मस्के यांची उपस्थिती होती. त्यांनी विद्याथ्र्यांना एमपीएससी. व यूपीएससीचा अभ्यास करण्यापूर्वी ५ ते १२ वी पर्यंतच्या पुस्तकांचा संक्षीप्त अभ्यास करावा सोबतच वृत्तपत्राचे वाचन करून इंग्रजी व्याकरणाचा अभ्यास करावा. या कार्यक्रमाचे आयोजन ग्रंथालय विभागातील ग्रंथपाल डॉ. प्रणाली पेटे, उमेश अरगुलेवार, राजरतन सुरवाडे यांनी केले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. प्रणाली पेठे व आभार प्रवीण वानखडे यांनी मानले. या कार्यक्रमाकरीता महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्याथ्र्यांची उपस्थीसह जवळपास १०० वाचकांची उपस्थीती होती.
0 टिप्पण्या