वरुड : चक्रीवादळामुळे वरुड तालुक्यात १६ मे रोजी मोठ्या प्रमाणात झालेल्या वादळी पावसामुळे वरुड तालुक्यातील ग्रामीण भागातील घरांच्या तसेच गोठ्याच्या शेडवरील पत्रे उडाले होते तसेच पिकांचे आणि फळबागांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी विशेष प्रयत्न केल्यामुळे नुकसान ग्रस्तांना तात्काळ मदत मिळवून देण्यासाठी २३ जून रोजी शासन निर्णय काढून प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून वरुड तालुक्यात बाधित झालेल्या व्यक्तींना मदत वाटप करण्यासाठी २ कोटी ५८ लक्ष ९४ हजार रुपयांचा निधी वरुड तालुक्याला प्राप्त झाला आहे.
तौक्ते चक्रीवादळामुळे वरुड तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे आमदार देवेंद्र भुयार यांनी स्वतः पाहणी करून अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर नेऊन तात्काळ पंचनामे करुन नुकसानग्रस्तांना मदत मिळण्यासाठी झालेल्या नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला होता आ. देवेंद्र भुयार यांनी यशस्वी पाठपुरावा केल्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळाल्याने वरुड तालुक्यातील नुकसानग्रस्तांना दिलासा मिळाला आहे.
आमनेर, ढगा, घोराड, बाभुळखेडा, पोरगव्हान, आमपेंड, बेसखेडा, मोर्शी खुर्द, वेढापुर, एकदरा वाठोडा, यासह वरुड तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात घरांची व गुरांच्या गोठयांची पडझड, छप्पर उडून जाणे, तसेच ईतर घरांना सुद्धा हानी पोहचली होती. प्रचंड प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्यामुळे संत्रा, मोसंबी, पपई, यासह ईतर पिकांची झाडे कोसळल्यामुळे संत्राच्या आंबिया बहाराची प्रचंड प्रमाणात गळ झालेली होती त्यामुळे आमदार देवेंद्र भुयार यांनी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिल्यामुळे नुकसानीचे सर्वेक्षण पूर्ण करून मदत पुनर्वसन विभागाकडे झालेल्या नुकसानीची तात्काळ मदत वाटप करण्याची मागणी करून राज्यशासनाकडे सातत्त्याने पाठपुरावा केल्यामुळे त्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आल्यामुळे आमदार देवेंद्र भुयार यांच्या प्रयत्नांना यश आले असून वरुड तालुक्याला २ कोटी ५८ लक्ष ९४ हजार रुपयांची मदत मिळाली असून नुकसानग्रस्त नागरिकांना आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते आर्थिक मदतिचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या