एक आँगष्ट लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी. एक थोर भारतीय नेते. त्यांनी मंडालेच्या तुरुंगात गीतारहस्य हा जगप्रसिद्ध ग्रंथ लिहिला. त्यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणतात.लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म २३ जुलै १८५६ ला रत्नागीरीस झाला. लहानपणापासूनच ते क्रांतीकारी विचारांचे होते. त्यांचं जन्मनाव केशव होतं. त्यातच टिळकांना त्यांच्या घरी बाळ म्हणत असत. पुढे ते बाळ नावानच प्रसिद्ध झाले. टिळकांचं केशव नाव ठेवण्यामागं एक उद्देश होता. त्याच्या पणजोबाचं नाव केशवराव होतं. त्यांना पेशवे दरबारी मानाची जागा होती. ते चिखलगावला राहात असून त्यांची खेतीवाडी चिखलगावात होती.
गंगाधरपंत हे शाळेत शिक्षक होते. त्यांची बदली पुण्याला झाल्यानं पुढं गंगाधरपंत पुण्यात स्थायी झाले. त्यानंतर काही दिवसातच टिळकांची आई पार्वतीबाई मरण पावली. त्यानंतर १८७१ मध्ये टिळकांचा विवाह करण्यात आला. त्यांच्या पत्नीचे नाव सत्यभामा उर्फ तापीबाई होतं. त्यांचा विवाह केला. कारण घरी कामे करायला कोणीही नव्हतं. त्यानंतर गंगाधरपंत हे ठाण्याला बदली झाल्याने ते ठाण्याला गेले. इथेच गंगाधरपंत हे १८७२ मध्ये मरण पावले. ते याच दरम्यान शालांन्त परीक्षा पास झाले होते. मुलांच्या शिक्षणासाठी गंगाधरपंतांनी काही रक्कम ठेवली होती. त्यामुळं टिळकांनी पुढे जावून डेक्कन महाविद्यालय मध्ये प्रवेश घेतला. इथे चांगले आरोग्य राखण्यासाठी ते नियमीत व्यायाम करीत असत.
१८७६ मध्ये बी ए पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. अखेर त्यांनी एल एल बी ही पदवी घेतली. डेक्कन महाविद्यालयातच टिळक आणि आगरकर यांची मैत्री झालेली होती. पुढे त्यांची मैत्री ही निबंधकार विष्णूशास्री चिपळूणकर यांच्याशी झाली. चिपळूणकर यांनी सरकारी नोकरी सोडून इंग्रजी शाळा काढायचे ठरवले. त्यातच १ जानेवारी १८८० मध्ये इंग्लिश स्कूलची स्थापना झाली. त्यातच त्या शाळेत टिळक विनावेतन शिकवू लागले. त्यानंतर या तिघांनी मिळून केसरी व मराठा हे वृत्तपत्र काढले. ते केसरी व मराठातून इंग्रज सरकारच्या अन्यायाबाबतचे लेख प्रसिद्ध करीत होते. त्यामुळं पुढं टिळक व आगरकर यांना चार महिण्याची शिक्षा झाली. त्यामना डोंगरीच्या किल्यात ठेवण्यात आले होते. पुढे त्यांना २६ आक्टोंबर १८८२ मध्ये डोंगरीच्या किल्ल्यातून सोडण्यात आले. त्यानंतर १८८२ मध्ये चिपळूणकर मरण पावले. त्यानंतर टिळकांनी डेक्कन सोसायटीची स्थापना केली व १८८५ मध्ये फर्ग्यूसन महाविद्यालय सुरु केले.
टिळक हे जहाल मतवादी व आगरकर हे मवाळ मतवादी होते. त्यामुळं पुढील काळात ते चांगले मित्र असले तरी त्यांचं व्यवस्थीत पटलं नाही. आगरकरांना सुधारणा ह्या स्वातंत्र्यापुर्वी हव्या होत्या. परंतू टिळकांना सुधारणा ह्या स्वातंत्र्यानंतर. इथूनच वाद उत्पन्न झाले व त्यांच्या कार्य करण्याच्या दिशाही बदलल्या. पुढे टिळकांनी डेक्कन एज्युकेशन संस्था सोडली. त्यानंतर ते ख-या अर्थानं स्वातंत्र्यसंग्रामात उतरले. त्यांनी इंग्रजांना ठासून सांगीतलं की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळविणारच. त्यांनी हे स्वराज्य मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असतांना आपल्या वृत्तपत्रातून सरकारवर कडक स्वरुपात टिकाही केली. १८९३ मध्ये हिंदू मुसलमान यांच्या जेव्हा दंगली उसळल्या. यात हिंदू मुसलमान यांच्यासह तिसरा पक्ष इंग्रजही आहे हे टिळकांनी प्रतिपादन केले नव्हे तर पंडीता रमाबाईच्या शारदासदन मध्ये दोन मुलींनी ख्रिस्त धर्म स्विकारला. म्हणून टिळकांनी त्यावरही सडकून टिका केली. पुढे हिंदू मुसलमान दंग्यानंतर १८ सप्टेंबर १८९४ आणि १५ एप्रिल १८९६ मध्ये केसरी व मराठा मधून त्यांनी शिवजयंती व गणेशोत्सव उत्सव आपण का साजरा करतो याचं प्रतिपादन केलं.
सन १८९६ मध्ये पुण्यात दुष्काळ पडला. प्लेगने लोकांच्या तोंडचे पाणी पळवले होते. त्यातच १८९६ मध्ये टिळकांनी सांगीतले की पीक कमी असेल तर सारामाफी हा शेतक-यांचा हक्क आहे. परंतू दुष्काळी परीस्थीती व प्लेग यासाठी नेमणूक करण्यात आलेल्या रँड या ब्रिटीश अधिका-यानं त्या बाबी विचारात न घेता या भागात धुमाकूळ घातला. त्यामुळं साहजिकच चिडून जावून पुण्यामध्येच चाफेकर बंधूंनी रँडचा खून केला. त्यामुळे त्याचा तीव्र असंतोष म्हणून सरकारनं पुण्यातील जनतेवर जास्त प्रमाणात जुलूम करणे सुरु केले. त्यामुळं टिळकांनी वृत्तपत्रात ठळकपणे लिहिलं राज्य चालविणे म्हणजे सूड उगविणे नव्हे. सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? याच दोन लेखांनी पुण्यात क्रांती झाली. लोकं रस्त्यावर उतरले आणि पुन्हा टिळकांवर इंग्रज सरकारने राजद्रोहाचा खटला भरला व त्यांना सहा महिण्याची शिक्षा झाली.
टिळकांनी १८९९ नंतर मागे वळून पाहिले नाही. लोकांनाही ते आपले नेते वाटू लागले. ते जनतेचे मसीहा ठरले. ते १८९९ ला तुरुंगातून परत आले. त्यांची लोकप्रियता वाढली होती. पुढे पुनश्च हरिओम या नावाचा पुन्हा केसरीतून अग्रलेख लिहिला व स्वातंत्र्यसंग्रामातील क्रांतीचे पुढचे पाऊल टाकले. २० जुलै १९०५ मध्ये बंगालची फाळणी जाहिर झाली. सर्व देशभर प्रक्षोभ उडाला. त्यांनी बंगालच्या फाळणीला विरोध केला. त्यातच स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या चतुसुत्रीचा पुरस्कार केला व सांगीतले की देशाची उन्नती याच मार्गाने होवू शकते. दुसरा मार्ग नाही. १९०७ मध्ये सुरतला काँग्रेसचं अधिवेशन भरलं. त्यात काँग्रेसमध्ये फूट पडली. टिळकांनी सांगीतलं की मला हा अध्यक्ष मान्य नाही. त्यामुळं टिळकांच्या अंगावर काठ्या फेकण्यात आल्या. त्यातच त्या ठिकाणी वाद तयार होवून २४ जुलै १९०८ ला पुन्हा टिळकांवर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला व त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांनी काँग्रेस सोडली.
१९१६ मध्ये पुन्हा काँग्रेस अधिवेशन भरले. त्यावेळी परत टिळक हे काँग्रेसमध्ये सहभागी झाले. या अधिवेशनात स्वराज्य मागणीचा ठराव एकमतानं संमत करण्यात आला. पुढे २० आगष्ट १९१७ मध्ये भारतमंत्री सर एडवीन माँटेग्यू यांनी भारताला भेट दिली. त्यांनी टिळकांची प्रत्यक्ष भेट घेतली. यावेळी माँटेग्यू चेम्सफर्ड सुधारणा जाहीर झाल्या. रौलट कायदा जाहीर झाला. पुढे या माँटेग्यू सुधारणा अपु-या वाटल्या. पुढे व्हँलेंटाईन चिरोल यांच्या इंडीयन अनरेस्ट या १९१५ मध्ये प्रसिद्ध केलेल्या ग्रंथात बदनामीकारक मजकूर छापल्याबद्दल टिळकांनी लंडनच्या कोर्टात अब्रूनुकसानीची फिर्याद केली. निकाल टिळकांच्या विरुद्ध लागला. हा निकाल १९१९ मध्ये लागला. परंतू त्यानंतर लोकांनी त्यांना भारतीय असंतोषाचे जनक ही पदवी दिली.
असा हा थोर देशभक्त १ आगष्ट १९२० मध्ये काळाच्या पदड्याआड गेला. त्यांनी आपल्या लेखनीतूनच नाही तर विचारातून स्वातंत्र्याची ज्योत लोकांमध्ये फुलवली. ज्या ज्योतीनं टिळकांना लोकांनी मानलं व ते टिळकांमागे उभे राहिले केवळ भारतीय स्वातंत्र्यासाठी. त्यांना वाटत होतं की टिळक हेच देशाला स्वातंत्र्य मिळवून देतील. पण दुर्दैव असं की ती लोकांची आशा फोल ठरली. कारण त्यांचा मृत्यु झाला होता व एका पर्वाचा त्यांच्या मृत्युनं अंत झाला होता. लोकांच्या आशा मावळल्या होत्या..!
- -अंकुश शिंगाडे
- नागपूर
- ९३७३३५९४५०
0 टिप्पण्या