• Mon. Sep 25th, 2023

हे चालले आहे…

स्वातंत्र्या….

आपण नागरिक आहोत
अशी जाणीव फुलून येते
तुझ्या वाढदिवसाच्या पानभर
रंगीत जाहिराती पाहल्यावर
एखादी बाई रिकामा घडा घेऊन
पाहत असते मिरवणूक
ज्यामध्ये अनवानी मूली
लेझीम खेळत असतात
बँडमास्तरच्या हुकमावर नाचत राहतात
हे असेच तंत्र असते भिणलेले अपरंपार
हा खेळ चालला आहे…
परीटघडीतले कपडे घालून
होते ध्वजारोहन
ज्यामध्ये जाणीवेपेक्षा उत्साहच
भरुन असतो. एक नवेकोरे स्वप्न पण असते..
देश असा वेगाने धावत सुटला आहे
चौपदरी महामार्गावरुन
माॕल्स उभे झालेत चौका चौकात
खरेदी विक्री चालली
कॕमेरा असा फिरत राहतो या दृश्यावर
शेअर्स मार्केट असते संवेदनाशील
निर्देशांक वधारतात कोसळतात
हे शेतात राबणार्याला ठावूक नसते
महागाईने ज्याचा खिसा फाटून जातो
ग्लोबल ईकाॕनाॕमीत .
अधिसत्ता आणि स्वातंत्र्य
सगळे विद्यापीठी परिसंवाद
चॕनलवरचे वाद विवाद गळी उतरवले जातात
हे………….
सामान्यपणे चालू असते
यामध्ये सामान्य माणूस कुठे असतो?
तो जणू बेजार झाला आहे.
किराणा दुकाणातील चिल्लर सामान
पेलत नाही त्याला …
सामान्य माणसाचे प्रश्न
सामान्य समजून दुर्लक्षिले जाते दुर्दैवाने
जणूकाही हेच निवडले असते
काय त्याने ?
रोज मरे त्याला कोण रडे?
हे चालले आहे…
सुभाष गडलिंग

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,