• Wed. Sep 27th, 2023

स्वातंत्र्य दिन

स्वातंत्र्याचा दिन l उगवला आज ll

सजला हा साज l भारतात ll१॥
करती साजरा lराष्ट्रीय हा सण ll
देशाचा सन्मान lचोहिकडे ll२॥
गात आहे मुलं l स्वातंत्र्याचे गीत ll
देशाचे संगीत l भारतात ll३॥
तोरणे पताका l कार्यालयी शाळा ll
कुसुमांच्या माळा l शूरवीर ll४॥
संघर्ष करुनी l रणात लढले ll
हुतात्मे ते झाले l देशासाठी ll५
स्वातंत्र्याच्या दिनीl करू या स्मरण॥
करांनी वंदना l कोटी कोटी ll६॥
-कवी : प्रा.अरुण बा. बुंदेले ,
अमरावती.
भ्र.ध्व.:-8087748609

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,