स्वातंत्र्यदिनाचा मुख्य सोहळा विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात

    अमरावती : भारतीय स्वातंत्र्याच्या ७४ व्या वर्धापनदिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात रविवार, 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजून 5 मिनीटे यावेळी आयोजिण्यात आला आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण होईल.

    Thank you for reading this post, don't forget to subscribe!

    स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या हस्ते ध्वजारोहण सकाळी 8 वाजता होईल. सोहळ्यानिमित्त विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर सुशोभित करण्यात आला आहे. कोरोना प्रतिबंधात्मक कार्यवाहीच्या अनुषंगाने सोशल डिस्टन्स आदी बाबींसाठी मार्किंग व इतर व्यवस्था पूर्ण करण्यात आली आहे.