• Fri. Sep 22nd, 2023

‘सुनहरे नगमे’ ऑनलाईन गीतांची मैफल मंगळवारी

    अमरावती: कलोतीनगर स्थित सिंफनी स्टुडिओ प्रस्तुत ‘सुनहरे नगमे’ ही ऑनलाईन गीतांची मैफल मंगळवार दिनांक १० ऑगस्ट रोजी रात्री ८.३० वाजता होत आहे. या मैफलीत प्रा. अरविंद मोकादम, राजेश भारद्वाज, सुषमा भारद्वाज, प्रा. मनीष देशमुख, गुरुमूर्ती चावली, सिरिषा चावली, अर्चना दुर्योधन, डॉ. गुणवंत डहाणे, प्रा. ड़ॉ. नयना दापूरकर, पल्लवी राऊत हे गायन करतील. या मैफलीत काही जुन्या आणि गोड गीतांची पेशकश स्थानिक कलावंत करणार आहेत.

    Thank you for reading this post, don't forget to subscribe!

    या कार्यक्रमात विशेषता ऍकॉर्डियनची साथ गजानन देऊळकर आणि मॅंडोलियनची साथ चंद्रशेखर भागवत करणार आहेत.
    वाद्यवृंदामध्ये पियानोची साथ सिंफनी गृपचे संचालक सचिन गुडे पियानेची साथ करतील, तबला आणि ढोलकची साथ विशाल पांडे करतील. कार्यक्रमाचे उत्कृष्ट चित्रिकरण अमिन गुडे यांचे आहे. संगीत संयोजन सुनीत बोरकर यांचे आहे. या मैफलीचे अभ्यासपूर्ण आणि बहारदार निवेदन नासीर खान करणार आहेत. सिंफनी स्टुडीओ अंतर्गत नवीन कलावंतांना मोफत संधी दिली जाणार आहे. अधिक माहितीकरिता गृपचे संचालक सचिन गुडे यांच्याशी संपर्क साधण्याची विनंती करण्यात आली आहे.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,