अखिल भारतीय मराठीसाहित्य परिषदेचे सिमा भागात पहिले अखिल भारतीय ऑनलाईन मराठी साहित्य संमेलन
सिमा भागाचा लढा हा मराठी अस्मितेचा लढा आहे सिमा भागातील नागरिक गेल्या ६५ वर्षापासून आंम्ही महाराष्ट्राची लेकरे आहोत असा आक्रोश करित आहेत कर्नाटक शासन अन्याय करित असतांना सिमाभागातील प्रत्येक उपक्रमांना पाठबळ देणे हे महाराष्ट्र सरकारचे कर्तव्यच आहे असे प्रतिपादन शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी केले.
पहिल्या अखिल भारतीय ऑननलाईन साहित्य संमेलनात ऊदघाटक म्हणून खासदार राऊत बोलत होते ते म्हणाले सिमाभागात भरणार्या साहित्य संमेलनाला मोठी गर्दी असते मराठी वरिल प्रेमापोटी सिमा बांधव अशा कार्यक्रमांना हजेरी लावतात बेळगावातील वाचनालयाची स्थिती मी पाहिली आहे अशी वाचनालये मराठी भाषा संकृतीचे जतन करत असून ती टिकविली पाहिजे बेळगावासह हा संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे सिमालढा हा अवघ्या महाराष्टाचा आत्म्याचा लढा आहे. बेळगाव महाराष्ट्राचे नाते साहित्य संमेलनातून अधिक दृढ होते तिथल्या व्यक्तिला जेंव्हा काठी बसते त्याचा वळ आंम्हाला जाणवतो सिमाभागात मराठी संस्कृती नांदत आहे मराठीचे मराठीपण टिकले पाहीजे यासाठी महाराष्ट्र शासनाकडून आर्थिक सहकार्य करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
संमेलनाचे अध्यक्ष मा.श्रीराम पचिंद्रे म्हणाले लेखक नवनिर्मिती करतो वास्तवाची सर्जनशिल मांडणी करतो अभिव्यक्ती स्वातंञ हे महत्वाचे आहे पण स्वातंञ म्हणजे स्वैराचार नव्हे हे लेखकांनी ध्यानात ठेवावे सरकारवर टिका करणे म्हणजे देशद्रोह नव्हे टिका लेखक आणि विचारवंत करत असतात विद्रोह अवश्य केला पाहीजे पण तो विधायक अश्या परिवर्तनासाठी असावा असा विद्रोह करतांना त्याला विवेकाची जोड हवी आहे असेही पचिंद्रे म्हणाले समाजाच्या जडणघडणित साहित्य समाजाबरोबर आहे साहित्य समाज घडविण्यासाठी जागृती साठी कार्य करीत असते साहित्य समाजाला वर घेवून जात असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वागताध्यक्ष मा. शरद गोरे यांनी बोलतांना सिमा भागातील जनता मातृभाषेच्या संर्वधनासाठी संघर्ष करित असून केंद्राने मध्यस्ती करून सिमा प्रश्न निकाली काढावा असे सांगितले.
साहित्यपरिषद कर्नाटक
राज्याध्यक्ष मा.रविंद्र पाटील यांनी सिमाभागात साहित्य संमेलन ही मराठी संस्कृतीला उर्जा देण्यासाठी होत असल्याचे प्रास्ताविक भाषणात सांगितले
सकाळी ऑनलाईन साहित्य संमेलनाला सुरूवात झाली यावेळी ऊदघाटन सञाला विशेष अतिथी म्हणून शिवसंत संजय मोरे परिषदेच्या राष्ट्रिय ऊपाध्यक्षा मा .शुभांगीताई काळभोर विश्र्वस्त ज्ञानेश्वर पंतगे!जिल्हाध्यक्ष ऍड. सुधीर चव्हांन,विदर्भातून विदर्भ प्रदेशाध्यक्ष मा. आनंद शेंडे,जेष्ठ साहित्यिक मा. शिवा प्रधान, विभागीय अध्यक्ष अमरावती सौ. स्विटी आनंदकुमार शेंडे विदर्भ विभाग कार्याध्यक्षा, सौ.संगिता बांबोळे विदर्भ अध्यक्षा महिला आघाडी ,सतिश सोमकुवर विभाग अध्यक्ष नागपूर , आदी परिषदेचे विभागीय पदाधिकारी आभासी ऑनलाईन साहित्य संमेलनाला वैदर्भिय प्रमूखांनी ऊपस्थिती दर्शविली. ऑनलाईन संमेलनाला सर्व सिमा भाग आणि तमाम परिषदेचे पदाधिकारी ऊपस्थित होते. साहित्य संमेलनाचे ढंगदार आणि अभ्यासू सुञसंचालन परिषदेच्या ऊपाध्यक्ष डी. बि.पाटील यांनी केले.
कविसंमेलन
साहित्य संमेलनाच्या द्धितिय सञात विशेषता बेळगाव सिमावर्ती भागातील व महाराष्ट्रातील एकंदर ७२कविंनी कविसंमेलनात निमंञित कवींच्या कवी संमेलनात सहभाग घेतला या महा कविसंमेलनाचे अध्यक्ष स्थानी विदर्भातील प्रसिध्द कवी व परिषदेचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष वणी यवतमाळ चे मा. आनंदकुमार शेंडे हे होते प्रमुख अतिथी म्हणून राजश्री बोहरा मॅडम होत्या.
सिमा भागातील गुरूनाथ किरमटे, शितल पाटील,धनश्री मुछंडी, स्वप्निल जोगणी, स्मिता किल्लेकर, अक्षता पिळणकर, भगत गावडे,डाॅ.संजीवनी खंडागळे, डाॅ.दौराकुमार पाटील, सुलोचना पाटील,महंमद गुणकी, जेष्ठ कवी शिवा प्रधान, सौ.स्विटी शेंडे, पदमाकर मांडवधरे,संदिप शेंडे, सुभाष मगर, प्रा.संजय धांडे, सतिश सोमकुवर, भावना खोब्रागडे, वर्षा ईंगळे, अलका धोंडणे, प्रकाश पिंपळकर, रोशनी हुंद्रे, नरेद्र् गुळघाणे, स्मिता पाटील, इंद्रकला बोपचे, नरेंद्र गुळघाने, अर्जुमनबानो शेख, शीतल शेगोकार, मिलिंद भंडारे, संजय धांडे,मधुकर दुफारे, सुभाष मगर, नामदेव राठोड, संतोष मेश्राम, प्रा.नाडगौडा मॅडम आदिनी या बहारदार कविसंमेलनाची रंगत वाढविली साडेपाचतास चाललेल्या याकविसंमेलनात एक कविता सादर करायची असतांना काहीनी दोन दोन रचना सादर करून काही कविना तासन तास कविता सादरिकरणासाठी वाट पहावी लागली समेलन संपत आले तरी जवळपास चाळीस कविना सहभागी करून घेता आले नाही प्रस्तावित यादी प्रमाने सूञ संचालीकेने कविंना पाचारण केले.
पूर्ण दिवसभर चाललेल्या या कविसंमेलनात कविंच्या विविधांगी रचना सादर होत होत्या तळियेमधे ऊध्वस्त घरे माणसे,गुर ढोर मृतपावलेल्या माणसा प्रती ओंथबलेली मनस्वी तळमळिची कविता सौ. स्विटी शेंडे यानी संमेलनात वास्तव स्थितिचे आकलन करणारी कविता प्रत्येक मनानामधे घर करत गेली विदर्भातील न्यायीक कविता मांडणी करतांना जिवघेण्या वर्णवादीसंस्कृती समतेची भाषा बोलणार्या कविता घटनाकाराची देण संविधान शेतकरीआत्महत्या कधी भणंग जिवन गाणि तर कधी सिमेवरचा आक्रोश याचे रूदस करनारी कविता अंतः र्मूख करित गेली कधी अंभग आला तर कधी गझल ,चारोळी असा हा कविसंमेलनाचा बहूढंगी बहर झडत गेला. रोशनी हुंद्रे यांनी देवदासिच जिवनगाण सादरकरीत सुञसंचालकीय कविता सादर केली प्रा .नाडगौडा मॅडमने छान सादरकरण केले गेयकविता सादरकरणामधे संगीता बांबोळे,भावना खोब्रागडे यांनिही आपला गायकीचा बाज कायम ठेवला. हिंदी कवी कुमारविश्वास यांच्या चालीतली कवीताही नरेंद्र गंधारे यांनी पेश केली. गेली साडेपाच तास पाऊस बरसावा तश्या कविता जराशिही ऊंसत न देता मनात दाटलेले कवितेचे आभाळ आज खुल्या दिलाने पावसासम रित्या होत गेल्या
कविसंमेलनाचे अध्यक्ष मा .आंनद शेंडे यांनी प्रतिकूल परिस्थितिचे चटके हा जीवन सर्घषाचा एक फुटका चष्मा हे प्रतिक वापरून वंचिताच्या व्यथा वेदनांची वाट आपल्या आदर्शांनी कशी ऊजागर केली हा समतेचा मळा संर्वांगी फुलविणार्या महात्मा ज्योतिबा फुले,डाॅबाबासाहेब आंबेडकर, राजर्श्री छाहू महाराज ,छञपती शिवाजी महाराज , संत तुकोबा, संत गाडगे महाराज ,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ,माता रमाई ,क्रांतिज्योती साविञी ,राजमाता जिजावू या विभूतिंचा आदर्श घेवून चालणारी ही महाराष्ट्राची एकतेची समतेची बंधू भावाची शांतीची विचारधारा घेवून जाणारी कवीमनाची सरीता वरील आदर्शाची पाईक होतांना दृष्टिपथास येते त्याचा प्रत्यय या संमेलनात वेळोवेळी येत गेला आनंद शेंडे यांनी सर्वसमावेशक असे प्रबोधन केली या ऑनलाईन कवी संमेलनात एक कमालीचा कविंचा जागर पाहून त्यांनी स्वतः पण आभार मानने गरजेचे समजले. कविलेखकासाठी एक हक्काचा मंच या अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेने ऊपलब्ध करून दिल्याबद्दल परिषदेतील पदाधिकार्यांचे आभार मानले. समेलनातील सर्व कवी प्रमुख पाहूणे यांचे परिषदेच्या वतिनेआभार मानन्यात येवून हा परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या साहित्य संमेलन मध्ये महाकाव्याचा पाऊस थांबला.
- शब्दांकन
- शिवा प्रधान
- विभागिय अध्यक्ष
- अमरावती
- भ्रमनध्वनि क्र ७०५७६०५९६८