अमरावती : निसर्गरम्य शहर परिसरात व तलावाच्या पायथ्याशी स्व.हरिभाऊ कलोती या नावाने नावलौकिक असलेला महानगर पालिकेचा पहिला बगीचा म्हणजेच वडाळी उद्यान, आज ख-या अर्थाने उध्वस्त झाल्याचे पाहायला मिळत आहे. सर्वदूरवरची परिस्थितीचा आढावा पाहता शहरातील वैभव असलेल्या वडाळी उद्यानाची हि बिकट अवस्था भाजपच्या कार्यकाळात झाली असल्याचे मत शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख व माजी नगरसेवक प्रदीप बाजड यांनी केले आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!नगर पालिकेचा स्व,हरिभाऊ कलोती उद्यान अत्यंत सुंदर व सुबक होता. या उद्यानाची निर्मिती२५ एप्रिल १९७६ साली करण्यात आली, या उद्यानाचे भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे गृह, परिवहन व विधानकार्य उपमंत्री बाबुराव काळे यांच्या हस्ते संपन्न झाले होते, या सोहळ्याला ह.द.कलोती, प्रा.बी.जी.कडू व नियोजन व विकास समितीचे सभापती रा.अ.उमाळे हे उपस्थित होते. या उद्यानाची अमरावती नगर परिषद असतांना नियोजनपूर्ण करण्यात आली होती. उद्यान विकासाच्या दृष्टीने दहावे वित्त आयोग अनुदान निधी सन १९९७-९८ अंतर्गत संरक्षण भिंत बांधण्यात आली. त्याचाही सोहळा १५ ऑगस्ट २०११ रोजी माजी पालकमंत्री डॉ.सुनील देशमुख यांच्यासह आदी मान्यवरांच्या उपस्थित पार पडला. सदरचे वडाळी उद्यान न्यु राजहंस टुरिझम यांना महापालिकेने भाडे तत्वावर चालवायला दिला होता, परंतु भाडे तत्वावर चालवायची मुदत संपल्याने हे उद्यान सद्या स्थितीत बंद अस्वस्थेत पडलेले आहे.
खर सांगायचं म्हटल्यास वडाळी तलावाच्या पायथ्याशी असलेल्या या उद्यानात अमरावतीकर कौटुंबिक सहलीचा मोठ्या उत्साहात आंनद घेत होते. लहान मुलांसाठी झुकझुक गाडी (रेल्वे) व चिल्ड्रेन पार्कमध्ये असंख्य खेळण्याची पर्वणीच होती. विशेषतः उद्यान परिसरात उत्तम पार्किंग व्यवस्था, सर्व वयातील नागरिकांसाठी तलावात बोटिंग करण्याची व्यवस्था, गार्डन परिसरात लहान-मोठ्या पक्षांचा किलबिलाट त्याचबरोबर बगीच्याची सुंदर मांडणी असल्याने स्व.हरिभाऊ उद्यान जनता-जनार्धनासाठी आल्हादायक होते, मात्र आता या बंद अवस्थेत असलेल्या वडाळी उद्यानात जनावरे चरतांना पाहायला मिळत आहे. हे विशेष.
मात्र गेल्या ५ वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे सरकार गल्ली ते दिल्लीच्या सुवर्णसत्तेमध्ये असतांना या अत्यंत सुंदर उद्यानाकडे कुणीच का लक्ष दिले नसावे? आता हळूहळू उद्यान ओसाड पडायला लागलं आहे. मग ठेकेदाराच्या भल्यासाठी तर उद्यानाचा विकास सोडला नाही ना? असा प्रश्न नागरिकांमध्ये पडला असून याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चेला उधान आले असल्याचे मत हि प्रदीप बाजड यांनी बोलतांना व्यक्त केले. वडाळी उद्यानाची अवस्था अशीच कायम राहिली तर उद्या भूखंडावर डाव मारायला कुणीही मागेपुढे पाहणार नाही, असा टोला हि त्यांनी यावेळी लगावला आहे. अमरावती महानगरपालिका प्रशासन व मनपात असलेले सत्ताधारी – पदाधिकारी यांच्या नियोजन शून्य कारभारामुळे निसर्ग प्रेमी अत्यंत दु:खी झाले आहेत. अमरावती शहरासाठी वैभव असलेला त्याचबरोबर मनपाला आर्थिक उत्पन्न देऊन मनपाची मान-सन्मान उंचावणारा, एवढचं काय निसर्गरम्य व एकेकाळी अमरावतीकरांची तहान भागवणारा वडाळी तलाव आज हि मुबलक पाण्यानी भरलेला दिसतो, वडाळी तलावात पाण्याची सोय उपलब्ध असल्याने या उद्यानाचे पूर्णनिर्माण करून अमरावतीकरांना पुन्हा आल्हादायक उद्यान बहाल करावे असे हि प्रदीप बाजड यांनी पत्रकात म्हटले आहे.