- भंगलेल्या भिताडाची
- सांगतो ऐका कहानी
- जुन्या श्रीमंत गावाची
- दिसते जिवंत निशानी
- तुटला जरी साखळकोंडा
- तरी सौख्य नाही तुटले
- दोराने का होईना नाते
- एकमेकांशी घट्ट बांधून ठेवले
- कुरतडले जरी वैभव वाड्याचे
- रखवालदार अजून ताठ आहे
- दाराजवळील रुबाबात बाकडे
- आदरातिथ्यासाठी सज्ज आहे
- मोडून पडला रुबाब जरी माझा
- अजून शाबूत आहे माझा कणा
- फक्त पाठीवरती हात असू द्या
- नित्य असाच असेल ताठ बाणा
- -अरुण विघ्ने
- (चित्र सौजन्य संदीपजी धावडे दहिगावकर)