• Thu. Sep 28th, 2023

” बा स्वातंत्र्या ..! “

    बा स्वातंत्र्या …!
    तुले जल्माले यिवून
    चौ-याहत्तर वर्स पुरे झालेत !
    तुया जल्मानं सम्दे भारतवासी
    किती खूस व्हते म्हून सांगू राज्या..!
    सा-यायनं पेळे वाटले,
    घराले तोरनं लावले,
    तुये स्वागत केले ढोल तासे वाजवून,
    जल्लोस केला तुले डोस्क्यावर बसवून ..!
    तू सर्वायले अधार देसीन मनून ..!
    कोनं आपलं रगत सांडवलं,
    कोनं आपलं पोर गमावलं,
    कोन आपले मानसं गमावले,
    कोनं आपले बाप,भाऊ गमावले !
    आता तू चौ-याहत्तर वर्साचा म्हतारा झाला राज्या
    पन लोकं अजूनई समाधानी नाईत !
    अजूनई काई लोकायच्या झोपळ्यात स्वातंत्र्याचा सूर्य उगवलाच नाई ,ईषमता जाऊन समता आली नाई, शिरीमंत शिरीमंत झालेत गरीब गरीबच रायलेत.
    बाबासायबानं या देशाले राज्यघटना देल्ली
    त्यात सार्यायले हक्क, अधेकार,कर्तव्य लिहून ठिवले, समता,स्वातंत्र्य,न्याय,बंधुता हे मूल्ये देल्ले.
    ह्या लोकशाईच्या मूल्याले जपलं पायजे
    लोकायचे सारे अधेकार भेटले पायजे !
    तवाच तुले स्वातंत्र्य म्हनता येईन !
    तू कुठं हायेस, कुठं नाई मले तुया पत्ता माईत नाई , पन जिथं अस्सीन तिथं
    तुया जयजयकार !
    अरूण विघ्ने
    आर्वी

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,