• Thu. Sep 28th, 2023

प्रा.अरुण बुंदेले यांच्या”निखारा” काव्यसंग्रहाला क्रांतिज्योती सावित्रीबाई समाजप्रबोधन काव्यफुले पुरस्कार प्रदान

    अमरावती: कवी,लेखक,समाजप्रबोधनकर्ते प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांनी “आदर्श काव्य प्रबोधन” मालेतून काव्यक्षेत्रात दिलेल्या समाजप्रबोधनात्मक योगदानाबद्दल आणि नुकताच प्रकाशित झालेल्या त्यांच्या समाजपरिवर्तनवादी ” निखारा” या काव्यसंग्रहाला ” क्रांतिज्योती सावित्रीबाई जोतीराव फुले राज्यस्तरीय समाजप्रबोधन कव्यपुरस्कार-२०२१ ” नुकताच इर्विन चोेक ,अमरावती येथील विश्वरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यासमोर उपेक्षित समाज महासंघ,अमरावती यांच्यातर्फे सन्मानपूर्वक बहाल करण्यात आला.

    Thank you for reading this post, don't forget to subscribe!

    पुरस्कार वितरण सोहळ्याचे अध्यक्ष सत्यशोधक प्रा.श्रीकृष्ण बनसोड (अध्यक्ष ,उपेक्षित समाज महासंघ),सत्कारमूर्ती प्रा.अरुण बुंदेले,प्रमुख अतिथी माजी न्यायमुर्ती सुभाषराव धनोकार,श्रीकृष्णदास माहोरे(कार्याध्यक्ष ,उ.स.महासंघ),अँड.प्रभाकर वानखडे,समाजभूषण उत्तमराव भैसने तर प्रमुख उपस्थितीत प्रभाकर सुकळकर,मधुकर आखरे,सुभाष शिंदे,अनिल ठवरे,वसंतराव भडके होते.अध्यक्ष,प्रमुखअतिथी,सत्कारमूर्ती यांच्या हस्ते क्रांतिसूर्य महात्मा फुले ,क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले,साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेलाआणि विश्वरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला हारार्पण करून अभिवादन करण्यात आले.सत्कारमूर्ती प्रा.अरुण बुंदेले यांचा सविस्तर परिचय अँड.प्रभाकर वानखडे यांनी करुन दिला.पुष्पगुच्छ देऊन मन्यवरांचे स्वागत करण्यात आले. सत्कारमूर्ती समाजप्रबोधनकर्ते प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांनी”आदर्श काव्य प्रबोधन” मालेतून काव्यक्षेत्रात दिलेल्या समाजप्रबोधनात्मक योगदानाबद्दल आणि नुकताच प्रकाशित झालेल्या त्यांच्या समाजपरिवर्तनवादी ” निखारा” या काव्यसंग्रहाला ” क्रांतिज्योती सावित्रीबाई जोतीराव फुले राज्यस्तरीय समाजप्रबोधन कव्यपुरस्कार-२०२१” हा काव्यक्षेत्रातील मानाचा पुरस्कार शाँल ,श्रीफळ,मोमेंटो,पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन प्रमुखअतिथी माजी न्यायमूर्ती सुभाषराव धनोकार,समाजभूषण प्रा.श्रीकृष्ण बनसोड व उपस्थित प्रमुख अतिथींच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

    याप्रसंगी माजी न्यायमूर्ती सुभाष राव धनोकार यांनी,”पुरस्कार सतत कार्य करण्याची प्रेरणा देतात. प्रा.बुंदेले यांच्या निखारा काव्यसंग्रहातील बहुतेक कविता या समाजप्रबोधनात्मक असून सावित्रीबाईंच्या काव्यफुलांचे स्मरण करुन देणा~या असल्यामुळेच या पुरस्कारास ते पात्र ठरलेले आहेत.”असे विचार व्यक्त केले.

    सत्कारमूर्ती प्रा.अरुण बुंदेले यांनी,निखारा काव्यसंग्रहाच्या निर्मितीमागची पार्श्वभूमि सांगून १९९४ पासून आजपर्यंत ज्या सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक व काव्य प्रबोधन मालांचे आकाशवाणी, शाळा, महाविद्यालय व समाजामध्ये सादरीकरण केले त्याचा परिपाक म्हणजे “निखारा”होय,असे प्रतिपादन केले.

    अध्यक्षीय भाषणामध्ये प्रा.श्रीकृष्ण बनसोड यांनी,”प्रा.बुंदेले यांचा निखारा काव्यसंग्रह म्हणजे समाज परिवर्तनाचा थोर पुरुषांचा विचार समाजामध्ये पेरणारा आहे.त्यातील बहुतेक कविता गेय असून उपमा,यमक अलंकारयुक्त ,रसयुक्त व काव्यगुणयुक्त प्रासादिक आहेत. त्यांचे सत्तावीस वर्षापासून जे विविध क्षेत्रात कार्य सुरु आहे ते आज सेवानिवृत्तीनंतरही सुरुच आहे.अशा प्रभावी व्यक्तिमत्त्वाला त्यांच्या वाढ दिवशी आमच्या संस्थेतर्फे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.आमच्यासाठी ही आनंदाची गोष्ट होय. त्यांना पुढिल कार्यासाठी दीर्घायुष्य लाभो,ही सदिच्छा .” असे विचार व्यक्त केले. प्रा.बुंदेले यांना सर्वांनी साठाव्या वाढ दिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. समाजकार्यकर्ते अनिल ठवरे यांनी” निखारा” काव्यसंग्रहावर मनोगतातून प्रकाश टाकला. समाजभूषण उत्तमराव भैसने यांनी “कर्मयोगी संत गाडगे बाबा” या काव्यगीताचे गायन केले. कार्यक्रमाचे बहारदार संचालन अँड.प्रभाकर वानखडे तर आभार वसंतराव भडके यांनी मानले.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,