• Tue. Sep 19th, 2023

डेल्टा प्लस

    कोविड दुसरी लाट संपलेली आहे असे मानायला आता हरकत नाही. रुग्णसंख्या कमी झालेली आहे. गंभीर रुग्ण येण्याचे तसेच सारीचे रुग्ण सुद्धा कमी झाले आहेत. याचा अर्थ कोरोना संपला असा नाही. आणि तो एवढ्या लवकर संपेल असेही नाही. त्याचे जागतिक स्वरूप संपेल परंतु तुरळक ठिकाणी तो त्याचे अस्तित्व कायम ठेवेल हे नक्की. सार्स किंवा मर्स या आजाराच्या साथीची लाट यापूर्वी येऊन गेली परंतु आताही या आजारांचे रुग्ण निघत आहेत. याचाच अर्थ या आजाराचे विषाणू वातावरणात असून ते मनुष्याला संसर्गित करत आहेत. असाच प्रकार कोरोनाच्या बाबतीत राहील असे शास्त्रज्ञाचे मत आहे. आणि त्यामुळे या सर्व विषाणूच्या सहवासात मानवजातीला राहायचं आहे.

    Thank you for reading this post, don't forget to subscribe!

    विषाणूच्या बदलाच्या संदर्भात आपल्याला म्युटेशन, स्त्रेन आणि व्हेरीएंट या तीन शब्दांचा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. म्युटेशन हा विषाणूचा एक गुणधर्म आहे. विषाणू स्वतःपासून अनेक विषाणूची निर्मिती करत असतो. आपण असे समजू शकतो कि विषाणू एकाचे दोन, दोनाचे चार होवून असंख्य विषाणू तयार होत असतात. जनुकीय बदलामुळे विषाणूच्या रचनेत काही बदल होत असतात. त्यालाच म्युटेशन संबोधल्या जाते. म्युटेशनमुळे ज्या नवीन विषाणूची उत्पत्ती होते त्याला स्त्रेन म्हटल्या जाते. स्त्रेनची परिणामकारक शक्ती ही कमी किंवा जास्त असते. त्यापैकी काही स्त्रेन मरून जातात तर ज्यांची परिणामकारक शक्ती जास्त आहे ते जिवंत राहून शरीरात वाढत असतात. मूळ विषाणूच्या रचनेत बदल अर्थात म्युटेशन होऊन जो विषाणू तयार होतो त्याला त्या विषाणूचा वेरीएंट म्हटल्या जाते.

    कोरोना विषाणूचे बरेचसे वेरीएंट या महामारीत जगात फिरत आहेत. जीनोम सिक़ेन्सिन्ग तंत्रज्ञानाने यां वेरीएट चा शोध लावल्या जातो. वेरिएन्त्स चे तीन गटात वर्गीकरण केले आहे.

    1. Variant of Interest या वेरिएन्त्स चा अभ्यास कुतूहल किंवा आवड म्हणून केल्या जातो. एप्सिलोन, इटा, लोटा, कप्पा हे यात मोडतात.

    2. Variant of Concern या वेरिएन्त्स ची शास्त्रज्ञाना चिंता असते कारण या विषाणूमुळे कोरोनाचा गंभीर आजार होतो. अल्फा, बिटा, डेल्टा आणि गामा यात मोडतात.

    3 .Variant of High Consequence अशा प्रकारच्या विषाणूचे वेरिएन्त्स ज्यात संसर्ग रोखण्यासाठी करावयाच्या उपाय योजना आणि रुग्णाच्या उपचारामध्ये अतिशय जास्त परिणाम होणार आहे. आतापर्यंत या वेरिएन्तचा विषाणू सापडला नाही.

    सध्या डेल्टा आणि डेल्टा प्लस हे शब्द आपल्या नेहमीच कानावर पडत आहेत. तस पाहाले तर डेल्टा या वेरिएट चा उगमच भारतात झाला आहे. काही लेखकांच्या म्हणण्यानुसार डेल्टा वेरीएंत अमरावतीची देण आहे. दुसर्या लाटेत आपण याची दाहकता पाहली आहे. आपण सतर्क असल्यामुळेच या संसर्गाचा सामना समर्थपणे करू शकलो. साथरोग मध्ये कोणत्याही विषाणूची संसर्ग क्षमता ही आर व्ह्यालुव मध्ये मोजल्या जाते. अगदी सुरुवातीचा कोरोना विषाणू ची आर व्ह्यालुव ही २.३ ते २.७ इतकी होती. याच्याच अर्थ १०० पोझीतीव रुग्ण २३० ते २७० रुग्णांना संसर्गित करत असत. अल्फा वेरीएंत ची आर व्ह्यालुव ४ ते ५ होती तर डेल्टा ची हीच क्षमता ५ ते ८ आहे. याचाच अर्थ डेल्टा वेरीएंत चे १०० रुग्ण जवळपास ५०० ते ८०० सामान्य लोकांना संसर्गित करतात. आपण हे सर्व अनुभवलेले आहे. कुटुंबच्या कुटुंब आपण पोझीतीव होताना पाहले आहे.

    आता लोकडाऊन हळूहळू उठवल्या जात आहे. आपल जीवन सुरळीत होण्याची आपण सर्व वाट पाहत आहोत. परंतु डेल्टा व्हेव संपत नाही तोच डेल्टा प्लस चे संकट आपल्यासमोर उभे ठाकले आहे. महाराष्ट्रासहित केरळ आणि मध्यप्रदेशात डेल्टा प्लस चे रुग्ण सापडले आहे. आता तर तो आपल्या जवळच्या जिल्ह्यात येवून पोहोचला आहे. आणि म्हनुन जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. डेल्टा प्लस ला variant of concern म्हणून गणल्या गेले आहे. तर हा डेल्टा प्लस काय आहे ? डेल्टा प्लस हा जास्त संसर्गशील आहे. त्याची मारक क्षमता जास्त असून त्याला व्यवस्थित हाताळल्या गेले नाही तर आपल्या सर्वांसाठी घातक सिद्ध होऊ शकतो. सोबतच लस घेतलेल्यांना सुद्धा तो संसर्ग करू शकतो कारण लसीमुळे आलेली प्रतिकारशक्ती तो बायपास करू शकतो असे शास्त्रज्ञाना वाटते.

    सध्यातरी आपल्याकडे डेल्टा प्लस चे खूप कमी रुग्ण असल्यामुळे लसीचा त्याचेवर नक्की काय परिणाम होईल हे सांगणे कठीण आहे. परंतु जास्तीत जास्त लोकांच लसीकरण होणे आवश्यक आहे. यामुळे लोकांची प्रतिकार शक्ती वाढून त्यांना एकप्रकारचे संरक्षण मिळणार आहे. सोबतच कोविडचा संसर्ग रोखण्यासाठी कोविड अनुरूप वर्तणूक ज्यात मास्क लावणे, सामाजिक अंतर राखणे, वारंवार हात धुणे आणि गरज असेल तेव्हाच घराच्या बाहेर पडणे याचे आपल्याला पालन करावे लागणार आहे. आणि म्हणून डेल्टा प्लस ची भीती न बाळगता सतर्क राहणे आवश्यक आहे.

    डॉ. श्यामसुंदर निकम
    जिल्हा शल्य चिकित्सक
    सा.रु.अमरावती

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,