मुलगा खुप शिकावा त्यांने कुटूंबाचे नाव मोठे करून आपले भविष्य घडवावे असे प्रत्येक आई वडीलाला वाटते.
Contents hide
आज मुलांना उत्तम दर्जाचे शिक्षण देण्यासाठी पालक शहरातील नामांकित इंग्रजी माध्यमातील शाळेत मुलांचा
प्रवेश घेतात बहुतांश पालकांचा कल इंग्रजी शिक्षणाकडे दिसून येतो. परंतु यामध्ये काही पालक असेही असतात ते परिस्थितीमुळे आपणा मुलांना महागड्या व इंग्रजी माध्यमांच्या शाळेत आपल्या मुलांना टाकू शकत नाही
असेच एक उच्चविभूषित पालक दारव्हा तालुक्यातील रामगांव रामेश्वर या गावातील भगवान अगमे यांनी परिस्थिती जेमतेम असल्यामुळे आपल्या मुलाचा
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा रामगांव रामेश्वर या शाळेत प्रवेश घेतला पहिल्या वर्गापासून अमर हा अतिशय बुध्दिमान होतात त्यान त्यांचे १ ते ७ पर्यतचे शिक्षण जिप शाळेत पुर्ण केले त्याला शिकविणारे शिक्षक लीला डागा मॅडम चक्रधर घोटणे, महादेव निमकर, ओंकार राठोड व मुख्याध्यापक गौतम ढळे सर यांनी त्याला शिकण्याबद्दल सतत प्रोत्साहन दिले पुढे ८ वी ते१० वी पर्यत विश्वभारती विद्यालय कारंजा येथे शिक्षण पुर्ण केले ११ वी व १२वीचे शिक्षण विद्याभारती महाविद्यालय, कारंजा लाड येथे पुर्ण करून पीएमटी परीक्षेत उत्तम गुणांनी पास होवून मुंबईतील जे.जे. महाविद्याल, मुंबई, येथे डाॅ. या व्यवसायाचे शिक्षण घेण्याकरीता प्रवेश घेतला व तेथेही आपल्या बुध्दीमतेची चुणूक दाखवून तो एम. बी. बी. एस. हा वैद्यकिय अभ्यासक्रम प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केला आज डाॅ अमर भगवान अगमे वैद्यकिय अधिकारी म्हणून आदिवासी क्षेत्रात राळेगाव तालुक्यातील वरध येथे वैद्यकिय अधिकारी म्हणून सेवा देत आहे. पुढे M S/M. D करून त्याला रूग्णसेवा करायची आहे. ग्रामिण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकूनही आपण आपले व कुटूबांचे स्वप्न पुर्ण करू शकतो हे डाॅअमरने आपल्या जिद्दीतून पुर्ण करून दाखविले. विशेष म्हणजे त्यांचा मोठा भाऊही जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून अॅडव्हाेकेट झाला.
चांगले शिक्षक सकारात्मक पालक व मेहनती विद्यार्थी असेल तर जिल्हापरिषदेच्या शाळेत शिकणाही विद्यार्थी कुठल्याही क्षेत्रात प्रगती करू शकतो हे सिध्द झाले.
– महादेव निमकर
सहाय्यक शिक्षक पं. स. दारव्हा