Thank you for reading this post, don't forget to subscribe!
शिक्षक साहित्य संघ अमरावती शाखेतर्फे आँनलाईन व्याख्यान मालेचा उपक्रम
Contents hide
अमरावती : ” जीवनातील दुःखासाठी आपण स्वतःच जबाबदार असतो.प्रत्येकाने नेहमी सकारात्मक विचार करावा.चुका केल्यास पश्चाताप झाला पाहिजे.सुखी व्यक्ती सर्वांना सुखच वाटत असतो तर दुःखी व्यक्ती सर्वांना दुःखच वाटण्याचे कार्य करतो. दुसऱ्यांशी तुलना करण्यात श्रेष्ठता नाही तर स्वतःला ओळखण्यात श्रेष्ठता आहे.तुम्ही स्वतः काय आहात यावर तुमचे मूल्य ठरत नाही तर तुम्ही स्वतःला काय बनवलं यावर तुमचे मूल्य ठरत असते.म्हणून क्रांतीची सुरुवात स्वत:च्या अंतर्मनातून झाली
पाहिजे ” असे विचार जे.सी.आय. च्या राष्ट्रीय प्रशिक्षक प्रा.निता मुंधडा यांनी व्यक्त केले.
त्या शिक्षक साहित्य संघाच्या तेराव्या वर्धापन दिनानिमित्त शिक्षक साहित्य संघ जिल्हा शाखा अमरावती तर्फे नुकतेच ऑनलाईन व्याख्यानाचे चौथे पुष्प गुंफताना प्रमुख वक्ता या पदावरुन “क्रांती की सुरुवात अपने अंतर्मन से” या विषयावर बोलताना व्यक्त करीत होत्या.
याआँनलाईन व्याख्यान मालेच्या अध्यक्षा शिक्षक
साहित्य संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या मार्गदर्शिका प्रा.डाँ.
अनघाताई सोमवंशी ,प्रमुख व्याख्याता प्रा.निता मुंधडा (जे.सी.आय. च्या राष्ट्रीय प्रशिक्षक) तर प्रमुख अतिथी शिक्षक साहित्य संघाचे संस्थापक अध्यक्ष *जयदीप सोनखासकर* उपस्थित होते.
अध्यक्षा *प्रा. डॉ.अनघाताई सोमवंशी* यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून सर्वांना मंत्रमुग्ध केले व सुंदर आयोजनाबद्दल अमरावती जिल्हा शिक्षक साहित्य संघाचे आभार मानले. प्रमुख अतिथी *जयदीप सोनखासकर* यांनी मनोगत व्यक्त करताना अमरावती जिल्हा शाखेचे अभिनंदन केले.कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा.अरुण बुंदेले (अध्यक्ष, शि.सा.संघ,शाखा – नांद.खंडे.) यांनी , बहारदार संचालन *सौ.अश्विनी बुरघाटे यांनी केले. प्रमुख व्याख्याता प्रा.नीता मुंधडा यांचा परिचय कु.आशा बांबल यांनी करून दिला तर आभार प्रदर्शन शिक्षक साहित्य संघ जिल्हा शाखा अमरावतीचे जिल्हाध्यक्ष अतुल ठाकरे* यांनी केले.कार्यक्रमाला अमरावती,नागपूर,यवतमाळ,
मराठवाडा,अकोला व पुणे येथील शिक्षक साहित्य संघाचे पदाधिकारी व साहित्यिक ऑनलाइन उपस्थित होते.