अहिल्यादेवी होळकर कनिष्ठ महाविद्यालयाची यशाची कायम परंपरा

    आसेगावपूर्णा : अहिल्यादेवी होळकर कनिष्ठ महाविद्यालय,आसेगावपूर्णा येथील वर्ग 12 वी च्या विद्यार्थ्यांची यशाची परंपरा कायम राहिलेली आहे . त्यामागचं कारण म्हणजे ऑनलाइन वर्ग, सराव परीक्षा व मार्गदर्शन करून कला शाखेचा निकाल दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी सर्वात उत्कृष्ट असून निकालाची टक्‍केवारी 100 % टक्के आहे.

    Thank you for reading this post, don't forget to subscribe!

    यावर्षी कनिष्ठ महाविद्यालयाच्या 60 विद्यार्थ्यांनी एच. एस.सी .शालांत प्रमाणपत्र परीक्षेचेला बसले होते त्यापैकी 12 विद्यार्थ्यांना प्राविण्य प्राप्त श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले असून, 48 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. महाविद्यालयातून प्रथम क्रमांक कु. साक्षी विकास धाकडे 81 %, कु.मनिषा परिसे 80 %, कु .गायत्री डवंगे 79 %, कु.आचल नाचोने 79%, कु. ज्ञानेश्वरी गांजरे 79 %, कु. निकिता कैथवास 78 % ,कु. रुचिता वानखडे 76 % ,कु. आरती भोनखडे 75 %, कु. अमृत आठवले 78 %, कु.साक्षी राऊत 78 % , कु. तेजस्विनी गावंडे 75 % , कु. श्वेता बोबडे 75 % व इतर विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत.

    सर्व प्राविण्य प्राप्त उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. मेघशाम करडे यांनी अभिनंदन केले व सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्याच्या वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या . संस्था पदाधिकारी व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य कु. जे.बी. माहुरे, शिक्षक अजय गाडबैल, मनोज तायडे, स्वाती चौधरी तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व ग्रामस्थांकडून सर्व विद्यार्थ्यांचे व महाविद्यालयाचे कौतुक होत आहे.