Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

डफरीन पॉवर हाऊसला मनपाची जप्तीची नोटीस

अमरावती : महाविरतण आणि महानगर पालिका प्रशासन पुन्हा आमने सामने आले असुन २७ जुन रोजी मनपाकडे थकीत असलेल्या विज बिला अभावी महावितरणने शहरातील स्ट्रीट लाईट बंद केले होते. याचेच प्रतिउत्तर म्हणुन आज मनपाने डफरीन परिसरातील पॉवर हाऊसवरच जप्तीचे आदेश काढले असुन १५ दिवसात १३ करोड ६६ लाख ८३४ रुपये न भरल्यास कार्यालयावर जप्ती करण्यात येईल असे आदेशात नमुद करण्यात आल्यामुळे थकबाकी वरून महावितरण व महानगरपालिका प्रशासनामध्ये पुन्हा खडाजंगी सुरू झाल्याचे दिसुन येत आहे. २७ जुन रोजी संपूर्ण शहरातील स्ट्रीट लॉईट वरील विज महावितरणने बंद केली होती. याचाच परिणाम म्हणुन मनपा प्रशासनाला पदाधिकार्‍यांनीच घरचा अहेर देवुन मनपा ही चक्क ग्रामपंचायत असल्याचे सबोधले होते. दरम्यान मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांनी महावितरणला दिलेल्या आश्‍वासनानंतर लाईट सुरू करण्यात आली होती. विशेष म्हणजे मनपाकडे महावितरणचे जवळपास १९ करोड रुपये थकीत आहे. त्यामुळे महावितरणने हा निर्णय घेतला होता.मात्र डफरीत परिसरातील पॉवर हाऊसवर १३ करोड ६६ नाख ८३४ रुपयाचा संपत्तीकर थकीत असतांना देखिल महाविरणने शहरतील विज कशी कट असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर मनपा आयुक्त यांनी प्रतिउत्तर देत थेट महावितरणच्या पावर हाऊसला जप्तीची नोटीस पाठवुन १५ दिवसात १३ करोड ६६ लाख ८३४ रुपये न भरल्यास संबंधित संपत्तीवर जप्ती करण्यात येईल असे आदेशात नमुन करण्यात आले आहे. या प्रकारामुळे महानगरपालिका व महावितरण दोघेही आमने सामने आले असुन येणार्‍या काही दिवसात या प्रकरणाचा निपटारा प्रशासकीय स्तरावर कसा होणार हेच पाहणे आता औचित्याचे झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code